Friday , June 25 2021
Breaking News

महाराष्ट्रासह देशात थैमान!; सलग तिसर्‍या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाबळी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांत कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असून, दररोज झोप उडवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. सलग तिसर्‍या दिवशी देशात एक हजारांपेक्षा जास्त कोरोना बळींची नोंद झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः थैमान घातले असून, शुक्रवारी (दि. 16) सकाळी संपलेल्या 24 तासांत देशामध्ये दोन लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात तब्ल दोन लाख 17 हजार 353 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत, तर एक लाख 18 हजार 302 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बा म्हणजे देशातील मृतांचा आकडा सलग तिसर्‍या दिवशी एक हजारांच्या पुढे आहे. देशात 24 तासांमध्ये एक हजार 185 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या एक लाख 74 हजार 308 झाली आहे. महाराष्ट्राची स्थिती सर्वांत वाईट महाराष्ट्रात संचारबंदीचे नियम लागू झाल्यानंतरही कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी 61 हजार 695 रुग्ण आणि 349 मृत्यूंची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 लाख 39 हजार 855 झाली असून बळींचा आकडा 59 हजार 153 इतका आहे. सध्या राज्यात सहा लाख 20 हजार 60 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील 24 तासांत 53 हजार 335 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 29 लाख 59 हजार 56 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 टक्के आहे. यापूर्वी, 11 एप्रिलला एकाच दिवसात 63,294 रुग्ण समोर आले होते.

या राज्यांत दिलासा : देशातील 10 राज्यांमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद नसल्याने थोडाफार दिलासा आहे. लडाख, त्रिपुरा, मेघालय, सिक्किम, नागालँड, मिझोरम, मणिपूर, लक्षद्वीप, अंदमान-निकोबार द्वीप आणि अरुणाचल प्रदेशात गेल्या 24 तासांत एकही कोरोना रुग्ण दगावला नाही.

Check Also

सरकारच्या निर्णयाला वारकरी संघटनांचा विरोध

अकोला ः प्रतिनिधी कोरोनामुळे यंदाही पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. …

Leave a Reply

Whatsapp