Friday , June 25 2021
Breaking News

यूएईतून 80 मेट्रिक टन ऑक्सिजन जेएनपीटी बंदरात दाखल

उरण : रामप्रहर वृत्त

भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातून क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिराती (यूएई)ने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे.

जीएसएफ जिजेल हे जहाज ऑक्सिजनचे चार कंटेनर घेऊन दुबईतील जेबेल अलीहून बुधवारी (दि. 5) भारताकडे रवाना झाले होते. ते सोमवारी (दि. 10) जेएनपीटी बंदरात दाखल झाले. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे हे कंटेनर देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येतील आणि सध्याच्या कोरोना स्थितिवर मात करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल. भारत सरकारच्या बंदरे, नौकानयन व जलवाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार विदेशातून मदत घेऊन येणार्‍या जहाजांना जेएनपीटी बंदरामध्ये नि:शुल्क सेवा दिली जात आहे त्याचबरोबर ऑक्सिजन कंटेनरची विनामूल्य हाताळणी करण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून दिली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून अनेक आव्हानांना सामोरे जात असूनही जेएनपीटीने माल हाताळणीमध्ये निरंतर वाढ केली आहे. एप्रिल 2021 मध्ये, जेएनपीटीने 468,015 टीईयू माल हाताळणी केली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत हाताळणी केलेल्या 283,802 टीईयूच्या तुलनेत 64.91 टक्के अधिक आहे. जेएनपीटी हा नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. 26 मे 1989 मध्ये या बंदराची स्थापना झाली असून कामकाजाच्या तीनपेक्षा कमी दशकांत जेएनपीटी हे देशातील बल्क-कार्गो टर्मिनलवरून प्रीमियर कंटेनर पोर्ट म्हणून नावारूपाला आले.

सध्या जेएनपीटी येथे पाच कंटेनर टर्मिनल्स कार्यरत आहेत, ज्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (जेएनपीसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लि. (जीटीआयपीएल), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी), नव्याने स्थापन भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)चा समावेश आहे. या बंदरात सर्वसाधारण कार्गोकरिता शॅलो वॉटर बर्थ व आणखी एक लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, ज्याचे व्यवस्थापन बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टीयमद्वारे चालते.

कोरोनाच्या काळात गेले वर्षभर जेएनपीटी आपल्या भागधारकांसोबत देशातील पुरवठा साखळी निरंतर सुरू ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहोत. या आव्हानात्मक काळात आम्ही आमचे कर्तव्य बजावून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी वचनबद्ध आहोत.

-संजय सेठी, (भा.प्र.से.) अध्यक्ष, जेएनपीटी

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp