Friday , June 25 2021
Breaking News

वरवठणे कोविड सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर; एकही रुग्ण दाखल नाही

म्हसळा ः प्रतिनिधी

तालुक्यातील वरवठणे आयटीआयमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये तालुक्यातील एकही पॉझिटीव्ह किंवा लक्षणे असलेला रग्ण दाखल झालेला नाही. त्यामुळे हे सेंटर बंद पडण्याच्या मार्गावर आहे. म्हसळा तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 475 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून, 54 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक, पुरेसे कर्मचारी व तांत्रिक सुविधा द्याव्यात त्याचबरोबर कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी येथील प्रेस क्लबने केली होती. त्यानुसार म्हसळा (वरवठणे) आयटीआयमध्ये 40 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते, मात्र आजपर्यंत या सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल झालेला. आता म्हसळा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह 20 ते 30 खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) सुरू करण्यात येणार आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड, मोफत औषधोपचार, शरिराचे तापमान, ऑक्सिजनची पातळी, रक्ताच्या तपासण्या, छातीचे एक्स-रे, गरजूंना ऑक्सिजन सुविधा, चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp