Friday , June 25 2021
Breaking News

नांदगाव, आगरदांड्यात लसीकरणाला सुरुवात; पहिल्याच दिवशी ग्रामस्थांचा प्रतिसाद

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात रविवार (दि. 9) पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात करण्यात आली. या वेळी मुरुड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप, नांदगाव उपकेंद्राचे डॉ. नजिर कबले, उसरोली सरपंच मनीष नांदगावकर, नांदगावचे उपसरपंच अस्लम हलडे, माजी सभापती चंद्रकांत कमाने, जितेंद्र दिवेकर, जमिर बकवाल, आरोग्य सेविका निता दळवी, प्रज्ञा चौलकर, दिपाली हजारे, हेमंत नांदगावकर, नेहल पुलेकर, मोहन कोळी, गणेश भोबू आदी उपस्थित होते. बोर्ली आरोग्य केंद्रांतर्गत कोविशिल्ड लसीचे 80 डोस नांदगाव आरोग्य उपकेंद्राला उपलब्ध करुन देण्यात आले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार आगरदांडा येथील आरोग्य केंद्रातही लसीकरणास प्रारंभ झाला असून, तेथे 45 ते 60  वयोगटातील नागरिकांच्या पहिल्या व दुसर्‍या डोससाठी लसीकरण केले जाणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत जगताप यांनी सांगितले. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन सरपंच वृषाली डोंगरीकर, तहसीलदार गमन गावित, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकासनी चव्हाण यांच्या उपस्थित करण्यात आले. येथे पहिल्याच दिवशी शंभर जणांनी लसीचा फायदा घेतला.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp