Friday , June 25 2021
Breaking News

धरण, तलाव, धबधब्यांवर जाण्यास बंदी; कर्जत प्रांताधिकार्‍यांचे आदेश

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार

धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये याकरिता कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश जारी केले आहेत. कर्जत उपविभागात येणार्‍या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्टपर्यंत लागू असतील. सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाण्याच्या प्रवाहात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.  कर्जत तालुक्यातील आषाणे कोषाणे धबधबा, सोलनपाडा धरण, पळसदरी धरण, कोंढाणे धरण आणि धबधबा, पाली भूतीवली धरण, नेरळ जुमापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, पाषाणे तलाव, बेकरे धबधबा, आनंदवाडी धबधबा, टपालवाडी धबधबा आणि खालापूर तालुक्यातील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा व परिसर, आडोशी तलाव, बोरगाव धबधबा, भिलवले धरण, मोरबे डॅम, नढाळ-वरोसे धरण, वावर्ले धरण, माडप धबधबा, धामणी धबधबा, कलोते धरणावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील वदप व मोहिली धबधब्याचा उल्लेख प्रतिबंधात्मक आदेशामध्ये नाही. त्यामुळे तेथे पर्यटक जाऊ शकतात, मात्र दुर्घटना टाळण्यासाठी तेथे जाण्यावरसुद्धा बंदी आणावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

कशावर आहेत प्रतिबंध?

पावसामुळे निर्माण झालेल्या धबधबे परिसरात मद्य तयार करणे व विक्री करणे आणि मद्यधुंद अवस्थेत असणे, सेल्फी अगर चित्रीकरण करणे, धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणे, वाहन वेगाने चालवणे, वाहतुकीस अडथळा आणणे किंवा धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी करणे, असभ्य वर्तन व अश्लील हावभाव करणे, लज्जा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करणे, सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवणे तसेच जल, वायू, ध्वनिप्रदूषण करण्याला प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणे आवश्यक आहे.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp