Friday , June 25 2021
Breaking News

मुंबईत इमारत कोसळून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना बुधवारी (दि. 9) रात्री 11च्या सुमारास घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांचा समावेश आहे.
मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्री रहिवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत आठ लहान मुले आणि तीन व्यक्ती अशा 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना ढिगार्‍याखालून काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा …

Leave a Reply

Whatsapp