Sunday , July 25 2021
Breaking News

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीची गुरुवारी (दि. 24) बैठक झाली. या वेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसर्‍या पक्षाचे संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेले आणि तिसर्‍याने आमचा विश्वासघात केला असे हे सरकार आहे, असे शेलार म्हणाले. महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मताने, महाराष्ट्राचे नेतृत्व कुणी केले पाहिजे हे आधीच स्पष्ट केले होते. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथे अहंकाराचे सरकारच नव्हते, असे आशिष शेलार म्हणाले.

कोरोनाचे मृत्यू लपवले

राजावाडी हॅास्पिटलमधील एका तरूणाचे डोळे उंदीर कुरडतात आणि आज त्याचा मृत्यूही झाला. कोव्हिडचे 11500 मृत्यू लपवले. हे महाराष्ट्र मॅाडेल आहे का? तो लसीसाठी काढलेला एक रकमी चेक कुठे गेला? पावसात भिजला का? त्या रकमेचे काय झाले? पुढे असतील तर ते पैसे पॅकेज म्हणून लगेच द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितल की मला पूर्णपणे बाजू मांडण्यास मदत केली नाही. याला जबाबदार कोण? मराठा आरक्षणात झालेली चुक होती की हा ठरवून केलेला कट होता हे तुम्ही आता उत्तर द्यायला हवे. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार आहे, असे शेलार म्हणाले. दरम्यान, आमदार आशिष शेलार यांनी  शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला आहे. सेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून जे काही सुरू आहे ती बेबंदशाही असल्याची टीका राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

Check Also

मॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य

पनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …

Leave a Reply

Whatsapp