Saturday , October 16 2021
Breaking News

अर्जेंटिनाच्या विजयाचा कोल्हापुरात जल्लोष; हलगीच्या तालावर चाहत्यांनी धरला ठेका

कोल्हापूर ः प्रतिनिधी

अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने ब्राझीलचा 1-0ने पराभव केला. अर्जेंटिनाने 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा जल्लोष अर्जेंटिनामध्ये सुरू आहेच, पण इकडे महाराष्ट्रातील कोल्हापुरातदेखील या विजयाचा जल्लोष झाला. कोल्हापूरकरांचे फुटबॉल प्रेम नव्याने सांगायची गरज नाहीच. कोल्हापूर आणि फुटबॉल एक समीकरणच आहे. अर्जेंटिनाने कोपा अमेरिका 2021चा किताब आपल्या नावे केल्यानंतर कोल्हापुरात जल्लोष सुरू झाला आणि कोल्हापूरकरांचे फुटबॉल प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अर्जेंटिनाने सामना जिंकताच समर्थक खंडोबा तालीम मंडळाने मोठा जल्लोष केला. कोल्हापुरातील  खंडोबा तालीम अर्जेंटिना समर्थक आहे, तर त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला पाटाकडील तालीम ब्राझीलची समर्थक आहे. अर्जेंटिनाच्या विजयानंतर खंडोबा तालीम मंडळाच्या सदस्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरला.

Check Also

कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा; सर्वाधिक पदकांसह भारताचे वर्चस्व

लिमा ः वृत्तसंस्था कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 30 पदकांसह वर्चस्व प्राप्त केले. अनिश …

Leave a Reply

Whatsapp