Saturday , September 18 2021
Breaking News

‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’

मुंबई : प्रतिनिधी

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, सातार्‍यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

रायगड जिल्ह्यातली महाड जवळ असलेल्या तळीये गावात दरड कोसळून 44 नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर अद्यापही अनेक नागरिक बेपत्ता आहेत. घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून शोधमोहिम, बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या तळीये गावाच्या दौर्‍यावरून भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले, इतका वेगवान मुख्यमंत्री महाराष्ट्राच्याच काय देशाच्या इतिहासात झाला नसेल. तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ विरोधी पक्षाचे नेते सुद्धा दाखल झाले होते. मुख्यमंत्री मात्र दुसर्‍या दिवशी जात असल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

Check Also

खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने …

Leave a Reply

Whatsapp