Saturday , October 16 2021
Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंकडून नितीन गडकरींचे कौतुक

नागपूर ः प्रतिनिधी

येथील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 31) झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या वेळी त्यांनी गडकरी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. गडकरींचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले की, स्वप्न पाहायलाही धाडस लागते आणि स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिक मोठे धाडस लागते. तुमच्या जागी जर दुसरा कुणी असता तर म्हटला असता बघतो मी जरा, कसे शक्य आहे, काय होऊ शकते, कसे होईल. पण तुम्ही तत्काळ सांगितले मी करतो आणि करून दाखवलेत. आता तीच एक तुमची ओळख तुम्ही देशभरात आपल्या कर्तृत्वाने निर्माण करीत आहात. त्यासाठी मला तुमचा अभिमान आहे. तुमची पुढची वाटचाल आता तुम्ही ज्या गतीने करता आहात त्याच गतीने व्हावी, अशा मी शुभेच्छा देतो.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp