Saturday , October 16 2021
Breaking News

भाजप ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी राजेश गायकर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी कामोठे येथील राजेश गायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांची नियुक्ती जाहीर करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी (दि. 17) झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत, पनवेल शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, संतोष भोईर, युवा नेते दशरथ म्हात्रे, दिनेश खानावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप भगत, गणेश गायकर, आप्पा भागीत, जनार्दन पाटील, प्रवीण खंडागळे  आदी उपस्थित होते.
गायकर यांनी यापूर्वी जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस म्हणून काम केले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळत विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो तसेच जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्यावर ओबीसी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp