Saturday , October 16 2021
Breaking News

सुकापूरमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात

कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राचेही उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 17) सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूलमध्ये नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात शिबिर झाले तसेच या वेळी कोविड लसीकरण केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.
सुकापूर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुरावठ्यातून महसूल विभागातर्फे दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच या ठिकाणी नेरे आरोग्य उपकेंद्रातर्फे कोविड-19 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच योगिता पाटील, माजी उपसरपंच बुवाशेठ भगत, युवा नेते किशोर सुरते, यतीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, महेश केणी, उदय म्हसकर, प्रमोद भिंगारकर, चंद्रकांत केणी, राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, दिव्येश भगत, चेतन केणी, प्राची जाधव, पूनम भगत, मेनका खुटले, सर्कल श्री. मोहिते, तलाठी आरती रेवसकर, ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर भगत आणि तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp