Saturday , October 16 2021
Breaking News

महाडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात

नऊ प्रवासी जखमी

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील विन्हेरे-तुळशीखिंड मार्गावरील कुर्ला गावाजवळ महाड दिशेने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर बस रस्त्याकडेला पलटी झाली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले.

खेडकडून मुंबईच्या दिशेने निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर बस (एमएच-04, जेयु-6484) कुर्ला गावाजवळ आली असता एक उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्याकडेला पलटी झाली.

या अपघातात बसमधून गणेशोत्सव आटपून मुंबईला परतीच्या प्रवासाला असलेले मंगेश सुरेंद्र वांद्रे, वैदेही वांद्रे, रुची रवींद्र बांद्रे, अर्चना रवींद्र बांद्रे, सुनंदा सखाराम बांद्रे, पांडुरंग धोंडू भागणे, अमित प्रकाश भागणे, वैदेही विजय भागणे, देवकी पांडुरंग भागणे, (सर्व रा. बहिरवली, ता. खेड) हे जखमी झाले आहेत. या बाबत महाड शहर पोलीस ठाण्यात चालक दिनेश देवजी कोळंबे (रा. दापोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp