Saturday , October 16 2021
Breaking News

खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

खोपोली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने शालोम एज्युकेशन या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 17) खाऊचे वाटप तसेच भेटवस्तू देण्यात आल्या.

 भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुळकर, उपाध्यक्ष पूनित तन्ना, सरचिटणीस विनायक माडपे, कार्यकर्ते सिद्धेश पाटील, शहा, करण यादव, महिला मोर्चाच्या अश्विनी अत्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका शुभलक्ष्मी पाटणकर व पालक या वेळी उपस्थित होते. इंदरमल खंडेलवाल यांनी या वेळी शाळेला देणगी दिली.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp