Saturday , October 16 2021
Breaking News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेची पाहणी

रतलाम : वृत्तसेवा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-दिल्ली द्रुतगती मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. शुक्रवारी खुद्द गडकरींनी मध्य प्रदेशातल्या रतलाममध्ये रस्त्याचे परीक्षण केले. गडकरींनी एका कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी त्यांची कार 170 प्रतिकिमी वेगाने धावत होती. गडकरींनी द्रुतगती महामार्गाच्या घेतलेल्या चाचणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी गडकरींनी हेलिकॉप्टरमधून द्रुतगती मार्गाचा आढावा घेतला होता, मात्र आता त्यांनी कारमधून रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे. या वेळी गडकरी म्हणाले की, गुणवत्ता चांगली असायला हवी असे आम्ही आधीच रस्त्याची निर्मिती करणार्‍या कंपनीला सांगितले होते. आज केलेली चाचणी योग्य होती. या मार्गावर वाहने 120 किमी प्रतितास वेगाने धावू शकतील. गडकरींनी जवळपास पाऊण तास रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांच्यासोबत खासदार गुमानसिंह डामोर, अनिल फिरोजिया आणि सुधीर गुप्ता, रतलामचे आमदार चैतन्य कश्यप, डॉ. राजेंद्र पांडे उपस्थित होते. मध्य प्रदेशच्या तीन जिल्ह्यांमधून द्रुतगती मार्ग जाणार आहे. रतलाम, मंदसौर आणि झाबुआमधून द्रुतगती मार्ग जाईल. नोव्हेंबर 2022पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात आठ लेन असतील. त्यानंतर चार लेनचे काम पूर्ण करण्यात येईल.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp