Saturday , October 16 2021
Breaking News

नीरज चोप्राच्या ‘त्या’ भाल्याला दीड कोटींची बोली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला होता. नीरजने ज्या भाल्याचा थ्रो करून सुवर्णपदक पटकावले होते त्या भाल्याला लिलावात तब्बल दीड कोटींची बोली लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट म्हणून आलेल्या वस्तूंचा ई-लिलाव ठेवण्यात आला. हा लिलाव पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून सुरू होता. सर्व भेटवस्तूंपैकी नीरजच्या भाल्यावर सर्वांत जास्त बोली लागली आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, गुरुवारी रात्रीपर्यंत काही वस्तूंवर बोली लावण्यात आली, परंतु ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी त्यांच्या खेळादरम्यान वापरलेल्या क्रीडा उपकरणांसह बहुतेक वस्तूंची बोली संध्याकाळी बंद करण्यात आली. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलंय, ई-लिलावादरम्यान 8,600हून अधिक बोली लागल्या आहेत. याशिवाय भवानी देवीची ऑटोग्राफ केलेली फेन्स (1.25 कोटी), सुमित अंतिलचा भाला (1.2 कोटी), टोकियो 2020 पॅरालिम्पिक दलाने ऑटोग्राफ केलेली अंगवस्त्रे (एक कोटी) आणि लवलीना बोर्गोहेनच्या ग्लोव्हजवर (91 लाख) रुपयांची बोली लागली, अशी माहिती मंत्रालयाने दिली.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp