Saturday , October 16 2021
Breaking News

टी-20 वर्ल्डकप विजेता संघ होणार मालामाल!; आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम जाहीर

दुबई : वृत्तसंस्था

टी-20 वर्ल्डकपला 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघाली किती रुपयांचे बक्षीस मिळणार याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घोषणा केली आहे. विजेत्या संघाला 1.6 दशलक्ष डॉलर्स (12.2 कोटी), तर उपविजेत्या संघाला आठ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 6.1 कोटी रुपये मिळतील. याचबरोबर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना चार दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तीन कोटी रुपये मिळणार आहेत. सुपर 12मधील प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला 40 हजार डॉलर्स दिले जातील. या टप्प्यात नॉकआउट होणार्‍या संघांना 70 हजार डॉलर्स मिळतील, तर 16 स्पर्धक संघांना 5.6 दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस म्हणून वाटा मिळेल. या स्पर्धेसाठी डीआरएसचा वापर करण्यास आयसीसीने मंजुरी दिली आहे. टी- 20 वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाईल.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp