Saturday , October 16 2021
Breaking News

एकनाथ खडसेंना मोठा धक्का; पत्नीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 12) अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. याच प्रकरणात एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे यांच्यावरही सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून आरोप ठेवण्यात आलेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे. या दोघांवरही अटकेची टांगती तलवार असतानाच मंगळवारी पीएमएलए विशेष कोर्टाने मंदाकिनी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे तात्पुरता दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत येत्या 21 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून बांधकाम विभागाचीही चौकशी

वाशिम ः शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना 12 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील बांधकाम विभाग व देगाव येथील कार्यालयात ईडीच्या पथकाने चौकशी सुरू केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. पथकातील अधिकार्‍यांनी मंगळवारी (दि. 12) बांधकाम विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, देगाव येथील पार्टीकल बोर्ड, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय वाशिम व मंगरूळपीर पोलीस ठाण्याला भेटी दिल्याचीही चर्चा आहे.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp