Saturday , October 16 2021
Breaking News

उरणमधील अपघात रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार

विविध उपाययोजनांसंदर्भात चर्चा आणि पत्रव्यवहार

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

उरणमधील सातत्याने होणार्‍या अपघातांवर आळा घालण्यासाठी अथवा रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्ष पूर्व विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पदाधिकार्‍यांनी आमदार महेश बालदी, तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, ग्रामपंचायत खोपटे-बांधपाडा आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले आहे.

उरण तालुक्यात जेएनपीटी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बंदर असल्याने उरण तालुक्यातील पूर्व विभागात विविध कंपनी, सीएफएस गोडावून, कॅन्टेनर यार्ड यांचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. उरण तालुक्यातील पूर्व विभागात असलेल्या कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मुख्य रस्त्यावरून वाहने वळवीताना गाडीवर क्लीनर नसणे, मुख्य रस्त्यावर तसेच अपघात होणार्‍या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसणे, मुख्य रस्त्याच्या वळणाच्या ठिकाणी लाईटची सुविधा नसणे हे अपघात होण्याची मुख्य कारणे आहेत. या कारणांचा विचार करून भारतीय जनता पक्ष पूर्व विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

प्रत्येक कंपनीच्या मुख्य रस्त्याच्या वळणावर हायमास बसविणे, मुख्य रस्त्याच्या वळणावर कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, कंपनीत येणार्‍या जाणार्‍या वाहनावर ड्रायवर सोबत क्लीनर ठेवणे बंधनकारक करावे, अशा मागण्या संबंधित विभागाकडे करण्यात आल्या आहेत.

अपघात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितले. उरण मध्ये अनेक अपघात होत आहेत. त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाल्याने हे निवेदन कंपनी प्रशासन, शासकीय विभाग, तहसीलदार, आमदार यांना देण्यात आल्याचे भाजप चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

या वेळी भाजप चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, कोप्रोली विभाग अध्यक्ष शशी पाटील, बांधपाडा सरपंच विशाखा ठाकूर, विभाग अध्यक्षा सुगंधा कोळी, खोपटा युवा अध्यक्ष हेमंत ठाकूर, सदस्य अच्युत ठाकूर, सदस्य संदेश म्हात्रे, सदस्य  मिनाक्षी म्हात्रे, सदस्य देवानंद पाटील, प्रितम ठाकूर, परेश पाटील, ज्ञानदीप ठाकूर, जयेश ठाकूर, चंद्रहास ठाकूर, अमित घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp