Saturday , October 16 2021
Breaking News

न्हावेे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरिश्चंद्र म्हात्रे विराजमान

उरण : प्रतिनिधी

न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे हरिश्चंद्र म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच म्हात्रे यांचे अभिनंदन केले. न्हावे ग्रामपंचायतीमध्ये भाजप, शेकाप, काँग्रेस अशी स्थानिक पातळीवरील ग्रामविकास आघाडी आहे. पाच वर्षांच्या सत्ताकाळात ग्रामविकास आघाडीचे सरपंचपद तीन वर्षांसाठी शेकापकडे, तर दोन वर्षे भाजपकडे बहाल करण्याचा अलिखित करार करण्यात आला होता. त्यानुसार दोन वर्षांनंतर जितेंद्र म्हात्रे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी बुधवारी (दि. 13) निवडणूक जाहीर झाली होती. पीठासन अधिकारी गणेश तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणुकीत सरपंचपदासाठी हरिश्चंद्र म्हात्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत सर्वपक्षीयांनी त्यांचे अभिनंदन केले. नवनिर्वाचित सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे अभिवचन दिले. मावळते सरपंच जितेंद्र म्हात्रे यांनी हरिश्चंद्र म्हात्रे यांना शुभेच्छा देताना आपले सहकार्य यापुढेही राहणार असल्याची ग्वाही दिली. माजी सरपंच व ग्रामविकास आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर यांनी, आपण न्हावे ग्रामपंचायतीचे दोन वेळा सरपंचपद भूषविले असल्याने आपल्या अनुभवाचा फायदा ग्रामपंचायतीला होईल, असा विश्वास व्यक्त केला. निर्मला काशिनाथ ठाकूर यांनी हरिश्चंद्र म्हात्रे यांचे अभिनंदन करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. या वेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच सागर ठाकूर, जयवंत देशमुख, गणेश म्हात्रे, वामन म्हात्रे, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, उपसरपंच मंजुषा ठाकूर, सदस्य किसन पाटील, सागर ठाकूर, देवेंद्र भोईर, निर्मला ठाकूर, विजया ठाकूर, कल्पना घरत, अमृता पाटील, साधना तांडेल, नितीन भोईर, चंद्रकांत पाटील, अंबरनाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी एन. आर. शेडगे उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सरपंच म्हात्रे यांच्या सौभाग्यवती धनवंती ऊर्फ सिम्पल यांच्या चेहर्‍यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता. सरपंचपदी पती विराजमान झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

Check Also

सात नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या पंतप्रधान मोदींकडून राष्ट्राला समर्पित

दसर्‍याच्या मुहूर्तावर व्यापक सुधारणांना प्रारंभ नवी दिल्ली : वृत्तसंस्था दसर्‍याच्या निमित्ताने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Whatsapp