Breaking News

खांदा वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना आधार

पनवेल ः रामप्रहर वृत्त 

खांदा वसाहतील आझाद ज्येष्ठ नागरिक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते. यामधील सभासदांनी कोल्हापूर व  सांगली येथील पूरग्रस्तांकरिता एक पाऊल पुढे टाकत आर्थिक मदत जमा केली आणि त्याचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या माध्यमातून सोमवारी (दि.26) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला. खांदा वसाहतीतील निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी एकञ करून सभापती संजय भोपी यांनी आझाद ज्येष्ठ नागरिक संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांच्याकरिता सिडकोकडून विरंगुळा केंद्रही घेण्यात आले आहे. विविध सण उत्सव तसेच महिन्यातून एकदा सर्वांचा एकत्रित वाढदिवस साजरा केला जातो. संस्थेचे सभासद दररोज एकत्र येऊन एकमेकांशी हितगुज साधतात. परस्परांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होतात. एक -दुसर्‍यांना आधार देण्याचे काम ही सर्व ज्येष्ठ मंडळी करतातच. त्यातच काही दिवसापूर्वी कोल्हापूर सांगली या ठिकाणी आलेल्या महाप्रलयात हजारो जणांचा संसार उध्वस्त झाला. येथील जनजीवन विस्कळीत होऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. या पूरग्रस्तांच्या मदतीकरिता अनेक हात पुढे आले. त्यामध्ये खांदा वसाहतीतील ज्येष्ठ नागरिकसुद्धा मागे राहिले नाहीत. महापुरात उध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना आधार म्हणून आपल्या क्षमतेप्रमाणे आधार देण्याचे काम त्यांनी करण्याचा संकल्प केला. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी सभापती संजय भोपी यांच्यासह आझाद जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply