`रामप्रहर’च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! ‘रामप्रहर’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन १८ जुलै २००८ रोजी मुंबई विद्यापीठाच्या भव्यदिव्य अशा दीक्षांत सभागृहात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारीही उपस्थित होते. तसेच आमचे `मल्हार टीव्ही’ नावाचे न्यूज चॅनलही आहे. या चॅनेलची सुरुवात २ जुलै २००६ रोजी झाली. ‘नवी दिशा, नवा ध्यास’ घेऊन ही दोन्ही माध्यमे कार्यरत आहेत.
रायगड जिल्ह्यातील अग्रेसर वर्तमानपत्र म्हणून ‘दैनिक रामप्रहर’ वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला, क्रीडा, आरोग्य यांसारख्या सर्वच क्षेत्रांत समाजाचा आरसा म्हणून आम्ही योगदान देत आहोत. आमचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मार्गदर्शक सिडकोचे मा. अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीनुसार सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ‘दैनिक रामप्रहर’ आणि ‘मल्हार टिव्ही’ची आजवर वाटचाल राहिली आहे. माध्यमांचं बदलतं स्वरुप लक्षात घेता आपली दोन्ही माध्यमे कात टाकत आहे. त्यातूनच वेब पेज आणि अॅपची निर्मिती करण्यात आली आहे.
वॉट्सऍप, फेसबुक, यू ट्युब यांसारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यन्त पोहोचत आहोत. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. काळानुसार बदलावे लागत असले तरी वाचकांशी जुळलेली नाळ कायम राहील, किंबहुना या नव्या रूपात ती अधिक घट्ट होईल. त्यासाठी आपले नेहमीसारखे सहकार्य अपेक्षित आहे. आमच्या या प्रयत्नांना आपण निश्चित प्रतिसाद द्याल आणि आपल्या प्रतिक्रियाही कळवाल, ही नम्र अपेक्षा…