Breaking News

दाऊदला झटका; हसीना पारकरच्या घराचा लिलाव

मुंबई ः प्रतिनिधी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घराचा लिलाव काल करण्यात आला. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणून काल लिलावात गार्डन हॉलमधील फ्लॅट 1 कोटी 80 लाखांना विकण्यात आला आहे.

2014मध्ये हसीनाच्या मृत्यूआधी हसीना याच फ्लॅटमध्ये राहत होती, तसेच देश सोडून फरार होण्याआधी कुख्यात गुंड दाऊद हादेखील याच फ्लॅटमध्ये राहत होता. हसीना पारकरच्या मृत्यूनंतर धाकटा भाऊ इक्बाल कासकर तेथे राहायचा. 2017मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला तेथूनच बेड्या ठोकल्या होत्या. सीबीआयने 1997 साली दाऊदच्या या घरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता. ‘सफेमा’ने  दाऊदच्या गार्डन हॉल अपार्टमेंटमधील फ्लॅटवर टाच आणल्यानंतर त्याच्या लिलावासाठी 28 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते, तसेच लिलावासाठी 1 कोटी 69 लाख रुपये किंमत ठरविण्यात आली होती.

सफेमा कायद्यान्वये तस्करी व बेकायदेशीर कृत्यातून जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येतो. या कायद्याच्या कलम ‘68 फ’अंतर्गत तस्करी करणार्‍या आरोपीच्या नातेवाइकांच्या मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद आहे. ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कामकाज अथवा कारवाई करते. त्यांना 1998मध्ये या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते. हसीना पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एप्रिल 2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. दाऊदच्या कुटुंबीयांनी दाखल केलेली याचिका या वेळी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानुसार या घरावर टाच आणली असून पुढच्या कारवाईनुसार या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यात रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचादेखील सहभाग होता. गेल्या वर्षी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वाधिक म्हणजे 11.58 कोटी रुपयांची बोली लावून या मालमत्तांचा ताबा मिळवला आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply