Friday , September 30 2022

रायगड

These are all news about Raigad District

रायगडात 77 हजार 246 गोवंश पशुधनाचे लसीकरण

अलिबाग ः प्रतिनिधी लम्पी स्किन या पशुधनाच्या विषाणूजन्य संसर्गिय आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 77 हजार 246 गोवंश पशूधनाचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी …

Read More »

खालापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सिद्धेश जितेकर

खोपोली : प्रतिनिधी खालापूर बार असोसिएशनच्या मंगळवारी (दि. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत अ‍ॅड. सिद्धेश जितेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड.सागर चौगुले व सचिवपदी अ‍ॅड. अनघा कानिटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सर्वसाधारण सभेला खालापूर बार असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. आपल्या अध्यक्षपदाच्या …

Read More »

उतेखोल शाळेचे विद्यार्थी रमले वाचन जागरात

माणगाव : प्रतिनिधी नवरात्र उत्सवात सर्वत्र नृत्य, गाणी व विविध पारंपरिक संस्कृतीचा जागर होत असताना उतेखोल (ता. माणगात) गावातील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी माणगावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात वाचन उपक्रमात रमले आहेत. ज्ञानरचनावादी शिक्षण देणार्‍या या शाळेत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत विकसित होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.  विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, विविध पुस्तकांची ओळख …

Read More »

कर्जत एसटी आगार आपल्या दारी!; शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दिले मासिक पास

कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या नेरळ-कळंब एसटी बसमुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. बारावीपर्यंत शिकणार्‍या विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेतून एसटी तर्फे मोफत पास दिले जातात. तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जातात. हे पास कर्जत आगारात येऊन काढणे खर्चिक व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने आगार व्यवस्थापकांनी …

Read More »

पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत बिनविरोध

कर्जत : बातमीदार थेट सरपंचपदासाठी एक आणि सदस्य पदाच्या सात जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल  झाल्याने कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ही  ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. जानेवारी 2020मध्ये पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 13 ऑक्टोबर रोजी होत आहे. मात्र स्वतंत्रसैनिक वि. रा. …

Read More »

लेखी आश्वासन द्या; अन्यथा जनआंदोलन करण्याचा कोलाड पाटबंधारे विभागाला ग्रामस्थांचा इशारा

धाटाव : प्रतिनिधी आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला डिसेंबर महिन्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा रोहा तालुक्यातील वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील ग्रामस्थांनी रोह्याचे तहसीलदार व कोलाड पाटबंधारे विभागाला बुधवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला. देखभाल, दुरुस्तीच्या नावाखाली कोलाड पाटबंधारे विभागाच्या आंबेवाडी किल्ला ते निवी …

Read More »

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत लोहोपमध्ये शिबिर

खालापूर : प्रतिनिधी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत सोमवारी (दि. 26) खालापूर तालुक्यातील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 27 किशोरवयीन मुली, 49 गरोदर माता  तसेच 22 स्तनदा माता यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. खालापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, वैद्यकीय …

Read More »

खोपोलीत करिअर मार्गदर्शन शिबिर

खोपोली : प्रतिनिधी रणगाडे, अग्नीबाण, पाच हजार किमीपर्यंत मारा करणारी मिसाईल तसेच अत्याधुनिक आयुधे भारताने बनवली आहेत व बाहेरील देश त्यांची आपल्याकडे मागणी करीत आहेत, त्यामुळे आत्मनिर्भर भारत हे स्वप्न पूर्ण झाले आहे, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी खोपोलीत केले.रोटरी क्लब आणि विज्ञान भारती या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली …

Read More »

चौलचे शितळामातेचे जागृत देवस्थान

रेवदंडा ः प्रतिनिधी चौल म्हणजे प्राचीन चंपावतीनगरी,  प्राचीनकाळी चौलमध्ये 360 मंदिरे असल्याचा उल्लेख सापडतो. संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीस असलेले चौलचे शितळामाता मंदिर त्यापैकीच एक आहे. चौलच्या आंबेपुरी पाखडीत हिरव्या गर्द नारळ पोफळीच्या छायेत शितळादेवीचे भव्य मंदिर आहे. या देवतेवर आंग्रे घराण्याची दृढ श्रद्धा होती. आंग्रे काळातच 1759मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाल्याचे …

Read More »

तांबटमाळ-चिंबोड स्वप्नातील गाव म्हणून घोषित, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती

पाली : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे बनवण्यात आली आहेत. सुधागड तालुक्यातील तांबडमाळ-चिंबोड हे यामधील एक स्वप्नातील गाव.  फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या गावाची स्वप्नातील गाव म्हणून घोषणा केली. स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रुवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, …

Read More »