Breaking News

Monthly Archives: October 2021

राज्यसभा सदस्य समितीची अलिबागला भेट

अलिबाग : प्रतिनिधी राज्यसभा व उपविधान समिती महाराष्ट्राच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर आली आहे. गुरुवारी (दि. 28) या समितीने अलिबागला भेट दिली. अलिबाग समुद्रकिनारी जल प्रदूषणाबाबत असणार्‍या कायद्याचे पालन प्रशासनाकडून केले जात आहे की नाही, याबाबत  या समितीने पाहणी केली. या वेळी समितीने कुलाबा किल्ल्यालाही भेट दिली. राज्यसभेच्या बारा खासदारांचा समावेश …

Read More »

कर्जत आगारातून एकही बस धावली नाही

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत आगारातील सर्व कार्मचार्‍यांनी गुरुवारी (दि. 28) काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कर्जत आगारातून एकही एसटी गाडी बाहेर पडली नाही. राज्यातील एसटी कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. वेतनवाढ आणि राज्य शासनात विलिनीकरण …

Read More »

रायगड विभागात एसटी कर्मचार्यांचा बंद

अनभिज्ञ प्रवासी बसच्या प्रतीक्षेत अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या टाळेबंदीत सहा महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. आता कुठे लालपरी सर्व मार्गांवर पूर्ण क्षमतेने धावत होती, तितक्यात पगारवाढीसह इतर मागण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. परिणामी रायगडात गुरुवारी (दि. 28) प्रवाशांचे हाल झाले. संपाबाबत अनभिज्ञ असलेले प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत उभे असलेले पहायला …

Read More »

विनामास्क फिरणार्यांवर होणार कारवाई

पाली नगरपंचायतीचा इशारा पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. मात्र मास्क न घालणार्‍या व कोरोना नियमांचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक करवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 27) दिली. धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत, …

Read More »

पारंपरिक पणत्यांबरोबर चायना मेड पणत्याही बाजारात दाखल

पेण : प्रतिनिधी दिपावली म्हणजे दिव्यांचा सण, म्हणजे अंधःकारातून उजेडाकडे नेणारा तेजोमय सण. या सणात अंधःकारालाही प्रकाशमय करणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्या पेण बाजारपेठेत दाखल झाल्या असून, यामध्ये चायनीज पणत्यांचेही आक्रमण झालेले दिसत आहे. दीपावली उंबरठ्यावर आली असून पेणच्या कुंभारवाड्यात बनविण्यात येणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चायनीज पणत्यांही  बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या …

Read More »

‘बाहास माला सालंमा धाड’ पथनाट्याद्वारे वाडी-वस्त्यांवर प्रबोधन व जनजागृती

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प पाली : प्रतिनिधी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ’बाहास माला सालंमा धाड’ (बाबा मला शाळेत पाठवा) या पथनाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या पेण येथील अधिकारी …

Read More »

जिताडा पालनास व्यवसायिकतेची जोड हवी

कुलाबा किल्ला, पांढरा कांदा व जिताडा मासा ही अलिबागची ओळख आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील खारेपाट भागात आढळणारा  सोनेरी रंगाचा जिताडा मासा इतर माशांपेक्षा चवीला रुचकर असतो. अलिबागला आल्यावर पर्यटक या माश्यावर हमखास ताव मारतात. त्यामुळे त्याला मागणीदेखील भरपूर आहे. अलिबाग व पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील  शेतकरी आपल्या घरासमोर छोट्या …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची प्रवासी सुविधा समितीकडून पाहणी

फलाटावर लिफ्ट बसवण्याच्या सूचना पनवेल : प्रतिनिधी रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीने बुधवारी संध्याकाळी पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची पाहणी केली. या वेळी रेल्वेच्या अधिकार्‍यांना पनवेल रेल्वे स्टेशनवरील लोकलच्या फलाटावर लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याचे काम 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. या लिफ्टमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांची पनवेल रेल्वे स्टेशनवर …

Read More »

वाशिवली डोंगराळ भागात गावठी हातभट्टीवर कारवाई

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा गुरुवारी (दि. 28) उद्ध्वस्त केला. या कारवाईत 200 लिटर क्षमतेचे तीन प्लास्टिक ड्रममध्ये व …

Read More »

‘सुधारीत मासेमारी नियमावली मच्छीमारांसाठी अन्यायकारक’

उरण : वार्ताहर राज्य शासनाने तब्बल 40 वर्षांनंतर प्रस्तावित केलेला नवीन मासेमारी कायदा, हा सर्वसामान्य पिढीजात मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या मुळावर घाव घालणारा आहे. त्यामुळे या बाबतचे तीव्र पडसाद आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पाश्वभूमी काही दिवसातच कोकण किनारपट्टी सहित मुंबईमध्ये उमटतांना दिसतील, असे प्रतिपादन करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीचे संचालक हेमंत गौरीकर यांनी …

Read More »