Saturday , August 24 2019
Home / Shashikant Barsing

Shashikant Barsing

पनवेल : उरण तालुक्यातील पाणदिवे येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश ठाकूर यांनी पूरग्रस्तांसाठी 11 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. या मदतीचा धनादेश त्यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सभागृहनेते परेश ठाकूर, दिलीप ठाकूर उपस्थित होते.

Read More »

नवीन पनवेल ः येथील पाणी समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी सिडको अधिकारी राहुल सरोदे यांच्याकडे आपल्या समस्या नोंदविल्या आणि त्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. या वेळी पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

पनवेल ः भाजप सांस्कृतिक सेलचे तालुका संयोजक पंडित उमेश चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. सोबत जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापालिका प्रभाग समिती अ अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विभागीय अध्यक्ष प्रभाकर जोशी, कीर्ती नवघरे, खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष …

Read More »

पनवेल ः जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी व वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 20 खाटांचे ट्रॉमा केअर युनिट सुरु होणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून, त्याची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

गुळसुंदे येथे उद्या मराठा समाजाचा सत्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त रसायनी पातळगंगा विभाग श्री नाईक मराठा समाज व सकल मराठा यांच्या वतीने मराठा आरक्षण लढ्यातील लढवय्ये शिलेदारांचा जाहीर सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व जात प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम रविवारी (दि. 25) शंकर मंदिर गुळसुंदे येथे होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महादेव कचरे, सेक्रेटरी राजेंद्र दसवंते यांनी दिली. …

Read More »

खांदा कॉलनीत रंगली अभंगवाणी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ व सकाळ वृत्तपत्र समूह यांच्या माध्यमातून आयाजित ‘सकाळ प्रिमीयर नाते तुमचे आमचे’ हा कार्यक्रम खांदा कॉलनी येथील श्रीकृपा हॉलमध्ये गुरुवारी (दि. 22) झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात अभंग वाणी, महिलांसाठी खेळ पैठणीचा …

Read More »

रोडपाली स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त रोडपाली येथील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी (दि. 23) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी पाहणी केली.  त्या अनुषंगाने महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांना हा परिसर स्वच्छ करण्याचे सूचित केले. त्यानंतर काही तासातच महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून …

Read More »

पनवेल ः चांगू काना ठाकूर विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

Read More »

आरोग्य संमेलनात श्री धूतपापेश्वर यांचे आरोग्य शिबिर

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. …

Read More »

मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात फुटली ‘चॉकलेट’हंडी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले ’कृष्णा’ अ‍ॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची …

Read More »
Whatsapp