Tuesday , May 11 2021
Breaking News

Ramprahar Team

बांधकाम क्षेत्राला सिडको देणार एनओसी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा राज्य शासनाच्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली 2020  (युडीपीसीआर 2020) नुसार अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याकरिता नवी मुंबई क्षेत्रातील बांधकामांसाठी अंतरिम ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. यामुळे संबंधित भाडेपट्टाधारकांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकासह स्थानिक प्राधिकरणांकडून बांधकाम परवाना मिळवणे शक्य होणार …

Read More »

यूएईतून 80 मेट्रिक टन ऑक्सिजन जेएनपीटी बंदरात दाखल

उरण : रामप्रहर वृत्त भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात एएक्सएस कंपनीच्या एमव्ही जीएसएफ जिजेल जहाजातून क्रायोजेनिक स्वरूपातील 80 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन असलेले चार कंटेनर यशस्वीपणे उतरविण्यात आले. देशातील सध्याच्या कोविड महामारीच्या परिस्थितीत संयुक्त अरब अमिराती (यूएई)ने भारतास मेडिकल ऑक्सिजन कंटेनरची मदत पाठविली आहे. …

Read More »

लसीकरण केंद्रावरील सुविधांसंदर्भात नगरसेविका रूचिता लोंढे यांच्याकडून पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेकडून गेल्या आठवडाभरापासून 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविडविरोधी लसीकरणाचा दूसरा डोस सुरू झाला आहे. लसीकरणासाठी प्रभाग क्रमांक 19 येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2, कोळीवाडा येथे येणार्‍या नागरिकांना सुविधा निर्माण करण्याची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच पालिकेच्या अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली. प्रभाग क्रमांक …

Read More »

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत युसूफ मेहेरअली सेंटरकडून जनजागृती

पनवेल : वार्ताहर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागामध्ये अनेक अफवा पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी लोकजागृतीसाठी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले होते. या अवाहनाला प्रतिसाद देत पनवेल तालुक्यातील युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने गावोगावी …

Read More »

फळे, भाज्या निर्यातीला निर्बंधांचा फटका

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उन्हाळ्यात फळांचा हंगाम असतो. या फळांना जशी देशात मागणी असते तशीच विदेशातही असते. त्यामुळे या काळात फळांच्या बाजारातही तेजीचे वातावरण पाहायला मिळते, परंतु यंदा वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि कडक निर्बंध यांमुळे फळांसह भाज्यांची आयात-निर्यात थांबली. सध्या भाज्यांसह फळांची निर्यात सुरू असली तरी लॉकडाऊनचा 30 ते …

Read More »

लस खरेदी, ऑक्सिजन प्लांटसाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून निधी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे आरोग्य सुविधांवर ताण पडत आहे. ऑक्सिजनची कमतरता तसेच लसीचा तुटवडा यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. अशा परिस्थितीत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पालिकेला दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. लस खरेदीसाठी एक कोटी तर उर्वरित 50 लाख ऑक्सिजन …

Read More »

पोलिसांसोबत राबणारे होमगार्डस् मानधनाच्या प्रतीक्षेत

उदरनिर्वाहाचा प्रश्न पनवेल : वार्ताहर लॉकडाऊनची अंमलबजावणी, सण, उत्सव, यात्रा जत्रांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या बरोबरीने राबणारे म्हणून होमगार्डकडे पहिले जाते. त्यांनी मागील वर्षांपासून पोलीस दलाला मोठी साथ केली आहे. या वेळीही ते लॉकडाऊन अंमलबजावणीच्या उपाययोजनात आघाडीवर आहेत, मात्र या होमगार्ड चार-पाच महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातील सुमारे 100 ते 200 जणांना राज्य शासनाकडून …

Read More »

महागड्या औषधोपचारामुळे रुग्ण, नातेवाईक त्रस्त

कोरोना संकटात परवड नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणार्‍या लाखोंच्या बिलाने सर्वसामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. अशातच एकूण उपचार खर्चात औषधांचाच सर्वाधिक भार दिसून येत आहे. त्यात कमी किमतीची पर्यायी औषधे उपलब्ध असतानाही, ज्यादा किमतीची औषधेच वापरली जात असल्याचेही दिसून येत आहे. मागील एक वर्षांपासून …

Read More »

उल्हास नदीवर पर्यटकांची गर्दी

जमावबंदी आदेशाकडे दुर्लक्ष; स्थानिकांत नाराजी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातून वाहणार्‍या उल्हास नदीच्या किनार्‍यावर सध्या संध्याकाळच्या वेळी तुडूंब गर्दी होत आहे. शासनाने वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये संचारबंदी लावली, तसेच लॉकडाऊनमध्ये जमावबंदी लावून कडक निर्बंध जारी केले आहेत. दरम्यान, अशा वेळीही लोक घराबाहेर पडत असताना प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याबद्दल स्थानिकांत नाराजी …

Read More »

लसीकरणात पैठण ग्रामपंचायत अव्वल

100 टक्केलसीकरण; 18 ते 44 वयोगट मात्र लसीकरणापासून वंचित पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.  पैठण ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मोरे यांनी सतर्कता बागळून पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 45 वर्षांवरील ग्रामस्थांना कोविड लसीकरणासाठी नेले. या कामामुळे पोलादपूर तालुक्यातील पहिली 100 टक्के लसीकरण करणारी …

Read More »
Whatsapp