Sunday , April 11 2021

Ramprahar Team

आंबा, काजूच्या बागांना कडक उन्हाची झळ

मोहोर करपल्याने बागायतदार हवालदिल अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सध्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. पहिल्यांदाच मार्च महिन्यात पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. याचा फटका इथल्या आंबा पिकाला बसला आहे. कडक उन्हामुळे आंब्याचा मोहोर करपून काळा पडला आहे. दक्षिण रायगडातील काजू पीकालाही या उष्णतेच्या लाटेचे चटके जाणवू लागले आहेत. …

Read More »

तलवारबाजपटू रिद्धी पाटीलचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील तलवारबाजपटू रिद्धी पाटील हिने 24 ते 26 मार्चदरम्यान ओडिशातील कटक येथे झालेल्या 14 वर्षाखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सेबर या प्रकारात कांस्यपदक मिळवले. याद्वारे तिने रायगड जिल्ह्यास पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून दिला. …

Read More »

उरणमध्ये पिकवला कलिंगडाचा मळा

चिरनेरच्या शेतकर्‍यांचा यशस्वी प्रयोग उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यात भातशेतीबरोबर काही भागात वालांची शेती तसेच भाजीपाल्याचे उत्पादन मागील कित्येक वर्षांपासून घेतले जात आहे. त्यातीलच चिरनेर येथील शेतकरी गजानन चांगु केणी हे कित्येक वर्षे भाजीपाल्याचे पीक नियमित घेत होते, मात्र या शेतकर्‍यांनी भाजीपल्याबरोबर आपल्या शेतातील अवघ्या 25 गुंठे जागेत बेबी या …

Read More »

‘त्या’ नराधम पित्याकडून दुसर्या मुलीवरही लैंगिक अत्याचार

पनवेल ः वार्ताहर पनवेल तालुक्यातील उलवे भागात राहणार्‍या एका नराधम पित्याने आपल्या 13 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असतानाच याच नराधम पित्याने आपल्या दुसर्‍या मुलीवरदेखील लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या नराधम पित्यावर बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली दुसरा गुन्हा …

Read More »

ओएनजीसी प्रकल्पातील सीआयएस एफच्या जवानांनी वाचविले बुडत्याचे प्राण

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या पिरवाडी समुद्र किनार्‍यावर नेहमीप्रमाणे मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या नागावचे  प्रभाकर म्हात्रे (वय 63) यांना भुरळ आल्याने समुद्रातील लाटात ते बुडू लागला. समुद्राच्या पाण्यात कोणी तरी बुडत असल्याचे ओएनजीसी प्रकल्पातील पिरवाडी किनार्‍यावर गस्त घालणार्‍या सीआयएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले असता त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता …

Read More »

पनवेलच्या हवा प्रदुषणाचे मापन

कळंबोली, खारघर, तळोजात बसणार हवा गुणवत्ता मोजणी स्थानक पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात कळंबोली खारघर व तळोजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या हवेमध्ये प्रदुषण असल्याचे कृत्रिम पुप्फुसांद्वारे सिद्ध झाले होते. त्याचअनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर आणि काही स्वयंसेवी संस्थांनी या ठिकाणच्या हवेतील प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी प्रदूषण …

Read More »

ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज सज्ज -सुमा शिरूर

मुंबई ः प्रतिनिधी टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज आहेत, असे मत भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले आहे. भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 30 पदके मिळवत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. त्या पार्श्वभूमीवर शिरूर बोलत होत्या. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना (एनआरएआय) आणि भारतीय क्रीडा …

Read More »

शार्दुल ठाकूरला मिळाली महिंद्रांनी गिफ्ट केलेली गाडी

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेली दमदार थार एसयूव्ही गुरुवारी (दि. 1) मिळाली. याबद्दल शार्दुलने महिंद्रा यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत. अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे …

Read More »

पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात खेळण्यासाठी येणार?

आयसीसीचे मोठे पाऊल दुबई ः वृत्तसंस्था भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा भारतीय भूमीत क्रिकेटचा थरार रंगण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे. भारतात यंदा ट्वेण्टी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि त्या संदर्भात पाकिस्तानच्या सहभागावरून उडालेल्या गोंधळावर आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे.  भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, …

Read More »

‘आरसीबी’च्या नव्या खेळाडूची वादळी खेळी

ख्राइस्टचर्च ः वृत्तसंस्था आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार्‍या न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलनने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. अ‍ॅलनचा फॉर्म आरबीसीसाठी उपयुक्त ठरू शकतो. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील तिसर्‍या ट्वेण्टी-20 सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि 10-10 षटकांचा सामन्यांना निर्णय झाला. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा …

Read More »
Whatsapp