Sunday , April 11 2021

Ramprahar Team

सलून व ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगाव तहसीलदारांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी मिनी लॉकडाऊनच्या काळात सलून व ब्युटीपार्लर चालू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघातर्फे माणगांव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी जाहीर केली आहे. यामध्ये सलून, स्पा, ब्यूटी पार्लर यांच्यावरदेखील बंदी घालण्यात …

Read More »

गजबजणारा रायगड जिल्हा वीकेण्डला सुना सुना!

वीकेण्ड लॉकडाऊनला कर्जतमध्ये प्रतिसाद कर्जत : प्रतिनिधी शनिवार आणि रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते शनिवारी (दि. 10) एकदम निर्मनुष्य दिसत होते. नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेल रस्ते कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार बंद होते. कर्जत तालुक्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा उच्चांक …

Read More »

भारताकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचे सिराजचे स्वप्न

चेन्नई ः वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज कसून मेहनत घेण्यास व मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहे. देशाकडून खेळताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचे त्याचे स्वप्न आहे. सिराज सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघात आहे. 27 वर्षीय वेगवान गोलंदाज सिराजने नोव्हेंबर 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण …

Read More »

कसोटी स्पेशलिस्ट खेळाडूंना सरावासाठी मिळणार ड्युक चेंडू

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचे अव्वल कसोटीपटू पुढील दोन महिने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) व्यस्त राहतील, पण जर या टी-20 स्पर्धेदरम्यान ते लाल चेंडूने सराव करण्यास इच्छुक असतील तर भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) त्यांना ड्युक चेंडू उपलब्ध करून देण्यासाठी तयारी आहे. आयपीएलनंतर भारतीय संघाचा कसोटी कार्यक्रम बघता असे केले …

Read More »

सचिन तेंडुलकरची कोरोनावर मात

मुंबई ः प्रतिनिधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतला आहे. सचिनला 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सचिन पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता. कोरोनावर यशस्वीरित्या मात करून तो रुग्णालयातून घरी परतला असून, राहत्या घरी विलगीकरणात राहणार आहे. सचिनने कोरोनावर मात करून घरी परतल्याची …

Read More »

नागोठणे रोटरी क्लबकडून मदत केंद्राची सुविधा

नागोठणे : प्रतिनिधी शहरासह विभागातील अनेक नागरिकांना कोविड लसीकरणसंदर्भात माहिती जाणून घेता येत नसल्याने त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून येथील रोटरी क्लबच्या वतीने लसीकरणाचे ऑनलाइन अर्ज भरणे तसेच इतर माहिती मिळण्याच्या दृष्टीने बाजारपेठेत मदत केंद्र चालू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन  शुक्रवारी (दि. 9) दुपारी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांचे …

Read More »

वाफ घेण्याच्या मशीनचे भाजपकडून वाटप

कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजपचे  शहर अध्यक्ष बळवंत घुमरे व महिला मोर्चाच्या जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील  उपजिल्हा रुग्णालयामधील कोविड रुग्णांसाठी वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले. भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, चिटणीस रमेश मुंढे, मंदार मेहेंदळें, …

Read More »

भारताचे आणखी तीन नौकानयनपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताच्या विष्णू सारावानन तसेच गणपती चेंगाप्पा आणि वरुण ठक्कर या जोडीने ओमान येथे सुरू असलेल्या आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करीत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान पटकाविला. याआधी नेत्रा कुमानन हिने लेझर रेडियल प्रकारात ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले होते. भारताच्या तब्बल चार नौकानयनपटूंनी ऑलिम्पिकसाठी स्थान मिळवण्याची …

Read More »

सलून, ब्युटीपार्लर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी

रोहा नाभिक समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन धाटाव : प्रतिनिधी नाभिक समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेला सलून व  ब्युटीपार्लर सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी नाभिक समाजबांधवांनी रोहा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने जवळपास वर्षभर सलून व  ब्युटीपार्लर  बंद होते, त्यामुळे हातावर पोट असलेला नाभिक समाज …

Read More »

कोरोना जनजागृतीसाठी नागरी संरक्षण दल सरसावले

अलिबाग : जिमाका जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड नागरी संरक्षण दलाने उरण व आसपासच्या परिसरात कोरोनाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, या चतु:सूत्रीचे कटाक्षाने पालन करण्याविषयी तसेच गर्दी न करणे, ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे …

Read More »
Whatsapp