Saturday , January 23 2021
Breaking News
Home / Ramprahar Team (page 30)

Ramprahar Team

धर्मशाळेस आर्थिक मदत; रुग्णांना चादर वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त ओवा गाव येथील संत गाडगे माहाराज धमार्थ निवास या धर्मशाळेच्या माध्यामतून सुनिल पाटील हे परिसरातील येणार्‍या अवे कॅन्सर रुग्नांची मनोभावे सेवा करत आहे. त्याअनुसंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या धर्मशाळेस भेट देऊन त्यांनी येथील रुग्णांना त्यांच्या हस्ते चादर वाटप करण्यात आले. तसेच या वेळी …

Read More »

माथेरानमध्ये प्रेमीयुगुल अपघातात जखमी

कर्जत : बातमीदार माथेरान फिरून घरी परतत असताना दोन प्रेमीयुगलांच्या दुचाकीने समोरून येणार्‍या वाहनाला धडक दिल्याची घटना माथेरान घाटात घडली आहे. या अपघातात दुचाकी चालवणार्‍या प्रियकराला जबर मार बसला असून त्याला पुढील उपचारासाठी बदलापूर येथे हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहिती नुसार हे प्रेमी युगल माथेरान फिरण्यासाठी रविवारी आले होते. माथेरान …

Read More »

ठाकरे सरकारला दणका!

कांजूरमार्ग मेट्रोशेडचे काम तत्काळ थांबवविण्याचे हायकोर्टाचे निर्देश मुंबई ः प्रतिनिधी मुंबई मेट्रो-3च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने बुधवारी (दि. 16) स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला …

Read More »

मोहोपाड्यातील सीसीटीव्ही पूर्ववत; ‘रामप्रहर’च्या वृत्ताची दखल

मोहोपाडा : प्रतिनिधी दैनिक रामप्रहरमध्ये सोमवार (दि.14)च्या अंकात मोहोपाड्यातील सीसीटीव्ही दुर्लक्ष या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच संबंधितांचे धाबे दणाणले आहे. याअगोदर प्रस्तुत प्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन परीसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते यावर चर्चा केली होती. ‘रामप्रहर’मध्ये वृत्त प्रसिध्द झालेल्या …

Read More »

खारघरमधील मैदाने खुली करा

नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी कळंबोली : प्रतिनिधी केंद्र तसेच राज्य सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली सार्वजनिक ठिकाणे खुली केली आहेत. त्यानुसार खारघर शहरातील जागतिक पातळीवर ओळख असेलले सेंट्रल पार्क मैदानदेखील सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी  पनवेल महानगरपालिका आयुक्तांकडे केली …

Read More »

मोर्बी धरण नजीकच्या जंगलात बिबट्याची कातडी, नखे दोघांकडून हस्तगत

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील मोर्बी धरणाजवळील जंगल परीसरात दोन व्यक्तींकडून बिबट्याची कातडी व नखे हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेने केली आहे. मोर्बी धरणाजवळील जंगल व डोंगराळ भागातील दोन व्यक्तींकडे बिबट्याची कातडी व नखे असल्याची बातमी मध्यवर्ती कक्ष गुन्हेशाखेच्या पोलीस नाईक सविन टिके यांना …

Read More »

कमला देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेकडून नामंजूर

चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमला देशेकरच पनवेल : रामप्रहर वृत्त सरपंच कमला एकनाथ देशेकर यांच्या विरोधातील अविश्वास ठराव ग्रामसभेने नामंजूर केल्याने चिंध्रण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा भाजपच्या कमला एकनाथ देशेकर याच असणार आहेत. चिंध्रण ग्रामपंचायतीचे सरपंच कमला एकनाथ देशकर यांच्या विरोधात आठ सदस्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला होता. या अनुषंगाने पनवेलचे नायब …

Read More »

जेलीफिशमुळे मच्छीमारांची डोकेदुखी वाढली

मुरूड : प्रतिनिधी मासळी पकडण्यासाठी मच्छीमारांनाखोल समुद्रात जावे लागते. मात्र मासळीच्या जाळ्यात सध्या जेलीफिश मोठ्या प्रमाणात अडकत असल्याने स्थानीक मच्छीमारांची डोकेदुखी वाढली आहे. जेलीफिशच्या स्पर्शाने हाताला खाज व सूज येत असल्याने मच्छीमारांच्या आरोग्याचा धोका वाढला आहे. जेलीफिश हे माशांची अंडी आणि पिल्लांना खातात. त्यामुळे सागरी मत्स्य साठ्यावर आणि वाढीवर परिणाम …

Read More »

द्रुतगती मार्ग बनला धोकादायक

 अनेक ठिकाणी लेन खचली; आयआरबीकडून कानावर हात खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील आडोशी गावाच्या हद्दीत काही ठिकाणी मार्गिका खचल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. भारतातील पहिला सहापदरी द्रूतगती मार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ओळखला जात होता. सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतुने बांधण्यात आलेला हा महामार्ग सध्या अपघात, लूटमार …

Read More »

पेणमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेण : प्रतिनिधी येथील कच्छ युवक संघ, गुजराती समाज व जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 13) पेणमधील जैन समाज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्वधर्मियांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. या वेळी डॉ. विनिता …

Read More »
Whatsapp