Sunday , April 11 2021

Ramprahar Team

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करावे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कर्जत तालुका आदिवासी बहुल असून त्यांची परिस्थिती हालाकीची आहे ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाहीत. मध्यमवर्गीय माणूससुद्धा  कोरोना उपचाराचा खर्च करू शकत नाही. या बाबींचा विचार करून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कोकण …

Read More »

मंदिरांतील पुजार्यांना आर्थिक मदत द्यावी

गुरव समाज नेते बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पुजारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिरांतील पुजार्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी  गुरव समाजाचे खजिनदार बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोनाच्या काळात सुमारे वर्षभर …

Read More »

भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहणार -जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते

मुरुड : प्रतिनिधी  सततच्या लॉकडाऊनमुळे आज व्यापारी व जनता त्रस्त आहे. मिनी लॉकडाऊन सांगून प्रत्यक्षात सर्वच दुकाने बंद करणे, ही महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका आम्हाला कदापी मान्य नाही. भाजप व्यापारी, सामान्य जनतेच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. अ‍ॅड. …

Read More »

महाडमध्ये भाजपची स्वाक्षरी मोहीम

महाड : प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोणताही विचार न करता जनतेवर लादलेल्या अन्यायकारक लॉकडाऊन विरोधात महाड भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 8) स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील छोटे व्यावसायीक आणि व्यापार्‍यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन अन्यायकारक असून, त्यामुळे गरीबांवर उपासमारीची वेळ …

Read More »

लॉकडाऊनविरोधात भाजप आक्रमक

कर्जतमध्ये प्रशासनाला निवेदन कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी राज्य शासनाने लावलेले लॉकडाऊनसदृश निर्बंध उठवावेत, या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप व्यापारी आणि उद्योग सेलच्या वतीने त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कर्जत तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. मात्र कृषी …

Read More »

रोह्यात 24 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

धाटाव : प्रतिनिधी कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या रोहा नगर परिषद हद्दीतील 24 व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रोहा नगर परिषद अत्यावश्यक सेवेखाली काही दुकाने बिनधास्त सुरु आहेत, काही दुकानदार मास्क न वापरता ग्राहकांना सेवा देत आहेत. मिनी लॉकडाऊनच्या काळात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांवर पोलीस व नगर परिषद प्रशासनाने दडांत्मक …

Read More »

उन्हाच्या काहिलीने माठाची मागणी वाढली

माणगावात राजस्थानी माठ दाखल माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तापमानाचा पारा 37 अंशपार झाला आहे. वाढणार्‍या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानावर माडक्यातील गारेगार पाणी हे सर्वसामान्यांना दिलासा देणारे असते. उन्हाळ्यात सर्वसामान्यांचा फ्रिज म्हणजेच माठ. या माठांना चांगली मागणी असते. ही बाब लक्षात …

Read More »

रोह्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद

व्यापार्‍यांचा नाराजीचा सूर, बाजारपेठेत तुरळक गर्दी रोहे ः प्रतिनिधी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचे पालन रोहा बाजारपेठेत होत असताना, प्रशासनाकडून मंगळवारी दुपारपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली. बुधवारीही शहरासह ग्रामीण भागातही दुकाने बंद करण्यात आली, त्यामुळे व्यापार्‍यांत नाराजीचा सूर आहे. रोहा शहरातील बाजारपेठेतील …

Read More »

पोलादपूरमध्ये व्यापारी आक्रमक

पोलिसांचा लाठीचार्ज पोलादपूर : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या आदेशांचा विपर्यास प्रशासनाकडून केला गेला आणि पोलादपूर शहरात काय बंद आणि काय सुरू ठेवायचे याबाबत प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांकडून बुधवारी (दि. 7) संपूर्ण बाजारपेठ बंद करण्याचा प्रकार झाला. त्यामुळे व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरला. काही पोलिसांनी लाठीचार्ज करुन व्यावसायिकांना पांगविले.  पोलादपूर शहरात गर्दी वाढल्यानंतर …

Read More »

पोलादपूरच्या विकासातील अडथळे दूर करण्याची गरज

रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून ओळखला जाणारा पोलादपूर तालुका हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार म्हणूनही ओळखला जात आहे. येथील भौगोलीक परिस्थिती, हवामान आणि जनजीवनामध्ये विविधता दिसून येते. ऐतिहासिक पार्श्वभूमी उज्ज्वल आणि वर्तमान खडतर असलेल्या या तालुक्याचे भवितव्य कसे असेल, याचे आत्ताच भाकित करणे धाडसाचे आहे. महाड तालुक्याचा भाग असलेला …

Read More »
Whatsapp