Sunday , April 11 2021

Ramprahar Team

मुरूडमधील शिबिरात 153 जणांचे रक्तदान

मुरुड : प्रतिनिधी राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ते लक्षात घेवून येथील महादेव कोळी समाज, श्रीयश हॉस्पिटल व जिल्हा शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये बुधवारी (दि. 7) घेण्यात आलेल्या शिबिरात 153 जणांनी रक्तदान केले. मुरूडमधील श्रीयश हॉस्पिटलमध्ये आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महादेव कोळी समाज अध्यक्ष …

Read More »

सुधागडच्या पेडलीमध्ये शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

पाली : प्रतिनिधी शिवकालीन विविध प्रकारची शस्त्रे ग्रामीण भागात दृष्टीस पडणे, म्हणजे एक पर्वणीच. सुधागड तालुक्यातील पेडली गावात सॅम मित्रमंडळाच्या वतीने नुकतेच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शिवकालीन तलवार, कट्यार, बिचवा, भाला, ढाल, दांडपट्टा आदी शिवकालीन विविध प्रकारची शस्त्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. त्यांची संपूर्ण माहितीदेखील या वेळी …

Read More »

सुधागडात रविवार सोडून प्रत्येक दिवशी लसीकरण

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात आता रविवार सोडून दरदिवशी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. 8) पासून ही सुविधा राबविण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी  दिली. सध्या ज्येष्ठ नागरिक, 45 वयोगटावरील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू आहे. तालुक्यात पाली व जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य …

Read More »

बाह्यकाठ्याच्या कामामुळे मच्छीमारांचे नुकसान

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील बहीरामकोटक गावातील बाह्यकाठ्या (संरक्षक बंधारा)च्या कामामुळे तेथील स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. पेण तालुक्यातील नारवेल बेनवले या 17 किमी खारबंदिस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र शासनाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका स्थानिक मच्छीमारांना बसू लागला आहे. बहीराम कोटक येथील मच्छीमारांनी कैफियत शासनदरबारी मांडूनसुद्धा त्यांच्या निवेदनाला शासनाने केराची …

Read More »

पालीमध्ये घरकुल घोटाळा

एकाच कुटूंबातील दोन भावांना योजना मंजूर; उपायुक्तांकडे तक्रार पाली ़: प्रतिनिधी प्रधानमंत्री आवास योजनेमधील अटी व शर्तीचे उल्लंघन करून पाली येथील एकत्र कुटुंबातील दोन भावांना घरकुल योजनेतून दोन स्वतंत्र नवीन घरकुले मंजूर केली असून, ती रद्द करुन संबंधीत शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार …

Read More »

मजूर नसल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील शेडचे काम रखडले

कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे सुरू असलेल्या शेडचे काम मे 2021 ला पूर्ण होईल, असे रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील पंकज ओसवाल यांना कळविले आहे. मात्र कोरोनामुळे ठेकेदाराला मजूर मिळत नसल्याने या शेडच्या कामाला विलंब होत आहे. असे मुंबई येथील रेल्वेचे अधिकारी आशुतोष गुप्ता यांनी …

Read More »

गणपती कारखानदार हवालदिल

बाप्पांच्या परदेशवारीला कोरोनाचा खो पेण : प्रतिनिधी राज्य सरकारने मिनीलॉकडाऊनला सुरुवात केल्याने आणि परदेशातही अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्याने पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदार अडचणीत सापडले आहेत. पेण हे गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणून जगात ओळखले जाते. याच पेणमधून लाखो गणपती मूर्ती परदेशात जात असतात. पेण तालुक्यातील हमरापूर, जोहे, अंतोरे, तांबडशेत यासह पेण शहरातील …

Read More »

नेरळ-कळंब रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले

कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणे बाकी आहे. खडीकरण आणि त्यावर टाकण्यात आलेली माती यामुळे या रस्त्यावरून वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून वाहन चालकांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण आणि …

Read More »

सज्ज राहा… सावध राहा…! कोरोना नियमांचे पालन करा

राज्यात वाढत्या कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने  शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत तर एरीळपस ेष ठशीीींळलींळेपी  झहरीशुळीश ेशिपळपस ेष श्रेलज्ञवेुप – चखडडखजछ इएॠखछ -ॠ-खछ अंतर्गत वेळोवेळी मानक कार्यप्रणालीचा (डजझ) अवलंब करुन, काही बाबी सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयानेही …

Read More »

लसीकरणाचे राजकारण

देशभरात 8.3 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यातील 83 लाख लोकांचे लसीकरण एकट्या महाराष्ट्रात झाले आहे. याचा अर्थ देशाच्या एकूण लसीकरणापैकी 10 टक्के लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. मग महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे असे कुठल्या तोंडाने म्हणावयाचे? परंतु तरीही राज्याच्या आरोग्यमंत्र्यांपासून मुंबईच्या महापौरांपर्यंत सारे सत्ताधारी नेते लसींचा तुटवडा असल्याचे सांगत …

Read More »
Whatsapp