Saturday , August 24 2019
Home / Arun Chavarkar

Arun Chavarkar

प्रत्येक माणसाला आयुषशी जोडणार : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

आरोग्यदायी महोत्सवाचे शानदार उद्घाटन नवी मुंबई : प्रतिनिधी आयुष मंत्रालयाचे मागील पाच वर्षांत 100हून अधिक कार्यक्रम झाले. ही पद्धती जगाचे कल्याण करणारी आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक माणसाला आयुषशी जोडायचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष नाईक यांनी केले. ते वाशी येथे बोलत होते. आयुष मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र …

Read More »

गणपती उत्सवासाठी विविध साहित्य

भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त कमळ महिला औद्योगिक सहकारी संस्थेतर्फे गणपती उत्सवासाठी भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा पनवेलमधील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले. उद्योगिनी, लघुउद्योजिका व बचत गटातील महिलांनी …

Read More »

पनवेलमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहतेय

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने नागरीकरण होणार्‍या पनवेलमध्ये सांस्कृतिक चळवळ उभी राहतेय ही आनंदाची बाब आहे. पनवेल शहर नावारूपाला येत असताना येथे राहणार्‍या प्रत्येकाने त्यात योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले. ते गुरुवारी (दि. 22) …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे ज्युडोमध्ये सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका अंतर्गत पनवेल येथे तालुका क्रीडा संकुलात नुकतीच ज्युडो स्पर्धा झाली. या स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले. 14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन पन्हाळे (इयत्ता सहावी) याने प्रथम क्रमांक, मुलींमध्ये जान्हवी पवार …

Read More »

कबड्डी स्पर्धेत वावळोली, चिवे संघांची चमक

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वावळोली व चिवे येथील आदिवासी आश्रमशाळांच्या संघांनी दिमाखदार कामगिरी केली. नांदगाव येथील संत नामदेव माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत वावळोली शाळेच्या मुलांनी 19 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक, 17 वर्षे गटात मुलींनी प्रथम क्रमांक आणि मुलांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजयी …

Read More »

बंगालकडून पटणाची शिकार

चेन्नई : वृत्तसंस्था सांघिक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या बंगाल वॉरियर्सने पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पटणा पायरेट्सचा 35-26 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगमध्ये विजयी आगेकूच केली. या दमदार विजयासह बंगालने गुणतालिकेत 33 गुणांसह दुसर्‍या स्थानी झेप घेतली असून, पटणा संघ 17 गुणांसह तळाला आहे. पटणाने नऊ सामन्यांतून सहा पराभव पत्करले आहेत. …

Read More »

जि. प. सभेत दूषित पाणी पेटले

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेची गुरुवारी (दि. 22) झालेली सर्वसाधारण सभा दूषित पाणीप्रश्नावरून गाजली. उमटे धरणातून गावागावांत वितरित होणार्‍या दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात आणल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.   गणेशोत्सवापूर्वी जलशुध्दिकरण प्रकल्प कार्यान्वित करून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत अध्यक्षा आदिती तटकरे यांनी वेळ मारून नेली. नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांचा आणि …

Read More »

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील भाजपत

कर्जत : बातमीदार काँगे्रसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील यांनी नुकताच पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप नेते माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे  जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, हृषीकेश जोशी …

Read More »

रविवारी उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री …

Read More »

पनवेल मनपा देणार गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

समन्वय समितीच्या बैठकीत महापौरांची घोषणा पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेने गुरुवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गणेशोत्सव 2019 समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी यंदापासून महानगरपालिका क्षेत्रातील उत्तम देखावे सादर करणार्‍या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, …

Read More »
Whatsapp