Saturday , August 15 2020
Home / Pravin Gaikar

Pravin Gaikar

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अजय कमलाकर वाघमारे (वय 22, रा. रोडे काश्मिरे फणसवाडी ता. पेण) याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. त्याचे पीडित मुलीबरोबर (वय 16) एप्रिल …

Read More »

डॉ. किरण पाटील यांची नागोठण्याला भेट

नागोठणे : प्रतिनिधी – राज्य पातळीवरील जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या ज्या कोणत्या योजना प्रलंबित आहेत त्याची ग्रामपंचायतीने माहिती द्यावी. माहिती उपलब्ध झाल्यावर त्या प्रश्नांसंदर्भात लवकरच अलिबाग येथे बैठक घेण्यात येईल, असे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतल्यानंतर …

Read More »

मुरूड तालुक्यात 10 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यात 10 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 194वर पोहोचली आहे. यापैकी 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर उर्वरित  37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील बोर्ली येथील पाच, महाळुंगे गावातील …

Read More »

खोपोलीत विजेचा लपंडाव; नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली शहरातील वीजपुरवठा दर मंगळवारी नियमित डागडुजी व दुरुस्ती कामासाठी दिवसभरासाठी खंडित करण्यात येते. तरीही दररोज दिवस-रात्र कोणत्याही वेळेला बत्ती गूल होण्याचा प्रकार वाढला आहे. विजेच्या या लपडांवामुळे विद्यार्थी, नोकरदारांसह सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. अगोदरच भरमसाठ वीज बिलांमुळे ग्राहकांचा रक्तदाब वाढला आहे. दुसरीकडे  अवेळी …

Read More »

मुरूड, नेरळमध्ये सफाई कर्मचारी वेतनाविना

मुरूड : प्रतिनिधी – येथील नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांना एप्रिल व मे महिन्यांचे वेतन अद्यापर्यंत न दिल्याने हे कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परस्थितीत इमानेइतबारे काम करूनसुद्धा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मानवाधिकार संघटनेने जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले आहे. …

Read More »

मजुरांची परवड सुरूच

शहरांमध्ये जुलैपासून अनलॉक सुरू झाल्याने कुशल कामगारांची उणीव जाणवू लागली आहे. परंतु लॉकडाऊनमधील महिन्यांच्या तोट्याचा बोजा डोक्यावर असताना व पुन्हा लॉकडाऊन येऊन आदळेल की काय अशी भीतीही वाटत असताना, पदरमोड करून मजुरांना शहरात आणणे, त्यांना पूर्वीसारखाच रोजगार देणे कंत्राटदार वा मालकांनाही परवडणारे नाही. तरीही बांधकाम व्यावसायिक व कारखानदार अधिकार्‍यांना पाठवून …

Read More »

पनवेल तालुक्यात 211 नवीन रुग्ण

11 जणांचा मृत्यू; 329 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 13) कोरोनाचे 211 नवीन रुग्ण आढळले असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 329  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 157 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 287 रुग्ण बरे …

Read More »

मुरूडमध्ये रंगला आगळावेगळा रानभाजी महोत्सव

मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समिती यांच्या विद्यमाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त पंचायत समितीच्या सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात नथुराम वाघमारे व सोमनाथ वाघमारे या आदिवासी बंधूंच्या सहाय्याने रानभाज्यांची आकर्षकपणे मांडणी करण्यात आली होती. यामध्ये …

Read More »

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घ्या; प्रशासनाचे आवाहन

अलिबाग : प्रतिनिधी – केंद्र शासनाचे राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळ (एनएफडीबी) यांच्यामार्फत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार मत्स्यव्यवसाय पूरक योजनांचा लाभ जिल्ह्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धक तसेच इतर इच्छुक लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मत्स्यसंवर्धन निगडीत अनेक योजना आहेत. त्यात गोड्या, निमखारे पाण्यातील मत्स्यसंवर्धनाकरिता मत्स्यबीज, कोळंबी बीज …

Read More »

पेण तहसील कार्यालयात दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी

सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली पेण : प्रतिनिधी – बारावी व दहावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी दाखले मिळविणार्‍यांची पेण तहसील कार्यालय आणि सेतू केंद्रात गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. मार्च महिन्यापासून तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ण कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत होत नसल्याने आणि दाखल्यांचे …

Read More »
Whatsapp