Sunday , April 11 2021

ई-पेपर

ई-पेपर

वाहतूक पोलिसांसाठी सलून सेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने उन्हातानात आपले कर्तव्य बजावणार्‍या व वाहतूक नियमन करणार्‍या वाहतूक पोलिसांसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलून आपल्या दारी या उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात वाहतूक पोलिसांना जागेवर जाऊन सलून सेवा देण्यात आली. पनवेल, कळंबोली, तळोजा व गव्हाण …

Read More »

राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; पदकांची लयलूट

पाली ः प्रतिनिधी इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या नवव्या राष्ट्रीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने चमकदार कामगिरी केली आहे. सर्व खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. श्रीनगरच्या इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम पोलो ग्राऊंड येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत देशभरातून 35 राज्यांतील 2400 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी …

Read More »

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘नृत्यआराधना’ची बाजी; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन व कौतुक

पनवेल ः रामप्रहर वृत्त अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिल सीआयडी पॅरिस (फ्रान्स) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ल्ड डान्सर ऑनलाइन इंटरनॅशनल डान्स कॉन्टेस्ट 2021 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कला निकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींनी, तसेच त्यांच्या प्रशिक्षकांनी नेत्रदीपक कामगिरी करून सुवर्णयश संपादन केले आहे. …

Read More »

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 25) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या मागणीचे निवेदन आठवले यांनी राष्ट्रपतींना दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकांची गाडी, सचिन वाझे प्रकरण, …

Read More »

टी-20 क्रमवारीत विराट चौथ्या स्थानी; मलान अव्वल

दुबई ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या टी-20 क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट चौथ्या स्थानी पोहचला, तर इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये फ्लॉप ठरलेल्या के. एल. राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. राहुलची एका स्थानाने घसरण झाली असून, तो फलंदाजाच्या यादीत आता …

Read More »

खोपोली पालिकेचे बँक खाते सील करण्याचे आदेश; महसूल थकबाकीमुळे नामुष्की

खोपोली ः प्रतिनिधी गौण खनिज दंडाची सुमारे 33 लाख 24 हजार 592 रुपये थकबाकीमुळे खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खोपोली नगर परिषदेचे बँक खाते सील करण्याचे आदेश काढले आहे. श्रीमंत पालिकेवर नामुष्की ओढावल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. खोपोली नगर परिषदेच्या भानवज येथील स.नं.58 /2 येथील क्षेत्र 0-03- 5 आर …

Read More »

‘त्या’ वेबसाइटवरील जातीवाचक गावांची नावे बदलण्याची मागणी

पनवेल : जातीवाचक गावांची अथवा वस्त्यांची नावात फेरबदल करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र तरीदेखील http://raigad.govt.in in या शासकीय वेबसाईटवर अनेक वस्त्यांची, गावांची नावे अद्यापही जातीवाचक असल्याने स्पष्ट दिसून येत आहेे. त्यामुळे जिल्ह्याच्या नकाशावरील या नावांमध्ये तत्काळ फेरबदल करण्याची मागणी आंबेडकरी लोकसंग्राम संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना …

Read More »

लोकशाहीचा कलगीतुरा

अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत घणाघाती आरोप केले आणि त्यांच्या जबरदस्त तोफखान्यासमोर सत्ताधार्‍यांची अक्षरश: गाळण उडाली. संबंधित तपास अधिकार्‍याच्या विरोधात इतके पुरावे उपलब्ध असताना त्याला अद्याप अटक का होत नाही, असा खडा सवाल फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी फडणवीस यांच्याकडे …

Read More »

वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सोनाली पाटील बिनविरोध

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड बुधवारी (दि. 3) करण्यात आली. सोनाली पाटील या वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा जासई विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे युवा नेते विलास पाटील यांच्या पत्नी आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोनाली पाटील या भरघोस मताधिक्याने विजयी …

Read More »

हिंदू मुन्नानी संघटना, चंद्रकांत सोमपुरा यांना श्री गुरुजी पुरस्कार जाहीर; अलिबागमध्ये होणार पुरस्कार वितरण समारंभ

अलिबाग : प्रतिनिधी रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार यंदा समाजप्रबोधन क्षेत्रात तामिळनाडूतील हिंदू मुन्नानी संघटना व कला क्षेत्रासाठी सुप्रसिध्द वास्तूविशारद चंद्रकांत बलवंतराय सोमपुरा यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व  सन्मानचिन्ह असे या …

Read More »
Whatsapp