Sunday , July 25 2021
Breaking News

Monthly Archives: August 2020

‘अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार’

मुंबई : प्रतिनिधीअंतिम वर्षाच्या परीक्षांसंबधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्य शासन नमले असून, परीक्षा घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जातील. परीक्षा शक्यतो ऑनलाईन घेण्याचा विचार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि. 31) येथे पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्र्यांशी …

Read More »

मंदिरे खुली करण्यासाठी पंढरपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन

पंढरपूर : प्रतिनिधीराज्यातील मंदिरे खुली करावी या मागणीसाठी भाजपपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (दि. 31) प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे आंदोलन करण्यात आले. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आठ दिवसांत नियमावली तयार करून मंदिरे खुली केली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री …

Read More »

कर्जतमध्ये जुगार अड्ड्यावर धाड

45 जणांना अटक; 38 लाखांचा ऐवज जप्त कर्जत : बातमीदारकर्जत शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रायगड पोलिसांनी धाड टाकून 45 जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. या ठिकाणाहून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि वाहने असा 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये रायगडसह मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे …

Read More »

पेण अर्बन बँकेचे ठेवीदार आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन खालापूर : प्रतिनिधीपेण अर्बन बँकेचे ठेवीदार आपले पैसे मिळविण्यासाठी न्यायदेवतेवर विश्वास ठेवून घोटाळ्याविरोधात अविरत लढा देत आहेत, पण उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याने या ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आहे. शासन व प्रशासन अजून किती अंत पाहणार याचा जाब विचारण्यासाठी 7 सप्टेंबरपासून ठेवीदार हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे …

Read More »

पनवेल महापालिकेची प्रथमच ऑनलाइन महासभा

रस्ते रुंदीकरणाला मंजुरी पनवेल : प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेची महासभा सोमवारी (दि. 31) प्रथमच ऑनलाइन झाली. या सभेत शहरातील रस्ते रुंदीकरणाला महासभेने मंजुरी दिली. त्यामुळे शहरातील महत्त्वाचे रस्ते लवकरच मोकळा श्वास घेताना दिसतील, शिवाय स्वच्छताही दिसणार आहे. पनवेल महापालिकची सर्वसाधारण महासभा कोविड-19मुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. पनवेल महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच …

Read More »

माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी (दि. 31) निधन झाले. 84 वर्षीय मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी …

Read More »

आरटीई अंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया अपूर्ण

प्रतीक्षा यादीतील पालक चिंतेत; शैक्षणिक नुकसानीची भीती नवी मुंबई : आरटीईच्या अंतर्गत प्रवेशाची ऑनलाइन सोडत मार्च महिन्यात जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे, निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश प्रकिया सुरू होण्यास विलंब झाला आहे. शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असून, निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. …

Read More »

सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा ऑनलाइन कार्यक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला. वैशाली सरदेशपांडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गुगल अ‍ॅपवर ऑनलाइन स्वरूपात केला गेला. पनवेल परिसरातील गणेशभक्तानी याचा लाभ घेतला. संस्थेच्या सभासद माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक …

Read More »

नवी मुंबईतील 850 पोलीस कोरोनामुक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश मिळविले आहे. त्याकरिता पोलिसांच्या वेलनेस टिमचे नियोजन महत्वाचे ठरत आहे. या दरम्यान अनेक पोलिसांच्या कुटुंबांना जीवदान देण्याचे काम या टीमच्या नियोजनातून शक्य झाले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे इतरत्र कौतुक होत आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला …

Read More »

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना प्रकृतीच्या समस्या

उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अडचण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना उपचारानंतर प्रकृतीच्या इतर समस्या जाणवत आहेत. त्यामध्ये दीर्घकाळ अशक्तपणा, मानसिक तणाव यासह उच्च रक्तदाबाच्या समस्या समोर येत आहेत, परंतु अशा समस्यांवर उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने अनेकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. कोरोनाची लक्षणे समोर येताच खासगी …

Read More »
Whatsapp