Friday , June 25 2021
Breaking News

Monthly Archives: June 2021

`दिबां`च्या नावासाठी जनसागर उसळला

राज्य सरकारला 15 ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटमअन्यथा विमानतळाचे काम बंद पाडण्याचा सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्तस्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे; अन्यथा दुसर्‍या दिवसापासून विमानतळाची सर्व कामे बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दि. बा. …

Read More »

सेंट जोसेफ विद्यालयाचा उद्दामपणा; शिक्षण अधिकार्‍यांच्या पत्राला केराची टोपली

कळंबोली : बातमीदार कळंबोलीच्या सेंट जोसेफ विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण शाळा प्रशासन देत नाही. पनवेलच्या गट शिक्षण अधिकार्‍यांनी लेखी पत्र देऊनही शाळा प्रशासनाने त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण निर्माण  असून याबाबत विद्यालयाच्या विरोधात पालक वर्ग …

Read More »

नवी मुंबई झाली भूमिपुत्रमय!

नवी मुंबई : प्रतिनिधी अखेर तो दिवस उजाडला…..म्हणत रायगड, नवी मुंबई, पालघर व ठाणे या चारही जिल्ह्यातील नागरिकांनी पहाटेपासूनच नवी मुंबईकडे धाव घेतली. बघता बघता नवी मुंबईतील रस्ते ही प्रकल्पग्रस्तमय झाले. म्हणे आम्हाला आमच्या बापाचे नाव विमानतळाला मिळावे या मागणीसाठी आज आम्हाला एकजुट दाखवावी लागली. आंदोलन व वटपौर्णिमादेखील योगायोगाने एकाच …

Read More »

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवारी (दि. 26) राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत, अशी …

Read More »

चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार -आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीची गुरुवारी (दि. 24) बैठक झाली. या वेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसर्‍या पक्षाचे संपूर्ण …

Read More »

महाराष्ट्र मॉडेल आहे की मृत्यूचा सापळा; देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीवर त्यांनी टीकेचे बाण सोडले. सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवले. त्याचबरोबर महाराष्ट्रात मृत्यूचे मॉडेल होते, अशी बोचरी …

Read More »

नवी मुंबईतील सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू होणार -आमदार मंदा म्हात्रे; नगरविकास खात्याने दर्शविला हिरवा कंदील

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. नगरविकास खात्यानेही या बाबत हिरवा कंदील दिला असून लवकरच सिटी सर्वेक्षणाची …

Read More »

सायन्स पार्कसाठी सिडको देणार नवी मुंबई महापालिकेला भूखंड

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाने नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर्स पार्क उद्यानाच्या भूखंडाची पोटविभागणी (सबडिव्हिजन) करून, विभाजित केलेला भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेला सायन्स पार्क विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने सेक्टर-19ए, नेरूळ येथील भूखंड क्र. 50 हा नवी मुंबई महानगरपालिकेला चिल्ड्रन्स थिम पार्क विकसित करण्याकरिता भाडेकराराने …

Read More »

सिडकोविरोधातील आंदोलन म्हणजे नांदी -संतोष ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आंदोलकांनी राज्य सरकारला एकजुटीची ताकद दाखवली, परंतु  राज्य सरकारने हे लक्षात घ्यावे की ही फक्त नांदी आहे, मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले नाही तर याचे रूपांतर निश्चितच वणव्यात होईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला …

Read More »

कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे करंजाडे वसाहतीत अँटीजेन चाचण्या

पनवेल : वार्ताहर करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने करंजाडे वसाहतीमध्ये कोरोना तपासणी सुरू करण्यासंदर्भात व वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तहसीलदार विजय तळेकर, विभागीय अध्यक्ष समीर केणी, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासमवेत सिडकोचे आरोग्य …

Read More »
Whatsapp