रानमेवा एप्रिल- मे महिना आला की रानमेवा मोठ्याप्रमाणात बाजारात दिसू लागतो.

सर्वगुणी जांभूळ, करवंद, कच्च्या काजूच्या बिया, पांढरेशुभ्र जाम, कोकम, आवळा, गावठी चुखायाचे आंबे अशा प्रकारचा रानमेवा सध्या बाजारात दाखल झाला आहे.

रानमेवा म्हणजे कोणत्याही प्रकारचे केमिकल मिश्रित नाही. निसर्गाने दिलेली देणगी होय.

रानमेवा हा उन्हाच्या कहिलीपासून दिलासा देणारा आहे.

रानमेवा पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटते, परंतु पूर्वीपेक्षा आता रानमेवा कमी उपलब्ध होऊ लागला आहे.

आदिवासी लोकांना रानमेवा जमा करण्यासाठी जंगलात दूर जावे लागते. रानमेवा दुर्मिळ झाल्याने रानमेवा महाग मिळू लागला आहे.

दैनिक राम प्रहर https://ramprahar.com/ वाचा आणि रहा अपडेट !