Breaking News

माझ्याही मनात आग धुमसतेय : पंतप्रधान मोदी

पाटणा : वृत्तसंस्था

पुलवामा हल्ल्यानंतर देशवासीयांच्या मनात भडकलेली आग माझ्याही मनात धुमसत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयकुमार सिन्हा आणि रतनकुमार ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते रविवारी (दि. 17) बिहारच्या बरौनी येथे बोलत होते. बिहारच्या बरौनी जिल्ह्यात विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांच्या मनात किती आग भडकलीय हे मी समजू शकतो, अनुभवू शकतो. जी आग तुमच्या हृदयात पेटलीय, तीच आग माझ्याही मनात धुमसत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या वेळी मोदी यांच्या हस्ते 13 हजार 365 कोटी खर्चाच्या पाटणा मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल. याशिवाय त्यांनी इतर डझनभर विकासकामांचेही लोकार्पण केले.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply