Breaking News
  • भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी खारघर येथे भव्य जाहीर प्रचार सभा झाली. या सभेला उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी महापौर कविता चौतमोल आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.