रसायनी प्रतिनिधी:
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मोहोपाडा आळी आंबिवली येथील चौदा वर्षीय शालेय विद्यार्थी गणेश विनोद चव्हाण हा मित्रांसोबत पाताळगंगा एमआयडीसी पंपहाऊस जवळील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मुत्यू झाला. तर जांभिवली धरणात चाळीस ते पंचेचाळीस वर्षीय वयोगटातील अज्ञात इसमाचे प्रेत जांभिवली येथील धरणाचे पाण्यात सडलेल्या अवस्थेत मिळून आला. याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात सिआरपीसी 174 प्रमाणे नोंद करण्यात आली असून रसायनी पोल्सी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शंनाखाली अधिक तपास सुरु आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper