उरण : रामप्रहर वृत्त
न्हावे येथील टीएस रेहमान शाळेत आईशी असलेल्या मैत्रीच्या निमित्ताने पालकत्व स्वीकारलेल्या अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिक्षक सतीशकुमार शर्मा यास अटक करून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्यातून दिली.
टीएस रेहमान शाळेत हॉस्टेलही आहे. त्या हॉस्टेलमध्ये पीडित मुलगी राहत होती. रविवारी सुटी असल्याने ती घरी आईकडे आली होती. त्या वेळी आई घरी नसल्याचा फायदा उठवत सतीशकुमार शर्मा याने रात्री मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याची तक्रार आईने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात केली. तक्रारीनुसार पोलिसांनी शर्मा यास अटक करून त्याच्यावर पोस्को आणि भा.दं.वि. 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper