मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
उरण : रामप्रहर वृत्त
भक्ती, शक्ती व श्रद्घेचा संगम असणारे शिव-समर्थ स्मारक सर्वांना प्रेरणा देईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 17) केले. ते स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.
जेएनपीटीच्या वतीने दास्तान फाटा येथे साकारल्या जात असलेल्या शिव-समर्थ स्मारकाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.
या सोहळ्यास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, आमदार निरंजन डावखरे, सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विराट जनसमुदाय हजर होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper