Breaking News

Monthly Archives: April 2019

मुंबईने दिल्ली जिंकली!

गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी झेप नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरच्या मैदानावर खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्स संघावर 40 धावांनी मात करीत मुंबई इंडियन्सने बाराव्या हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या 169 धावांचे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आले नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करीत दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. …

Read More »

शेकाप आता भांडवलदारांचा पक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर सभेत वाभाडे पेण : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष हा शेतकर्‍यांचा राहिलेला नसून आता भांडवलदारांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे शेकापने आपले नाव बदलून भांडवलदार कामगार पक्ष ठेवावे, असा सणसणीत टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 18) लगावला. ते महायुतीच्या पेण येथील जाहीर सभेत बोलत होते. …

Read More »

रायगडमधील जनता महायुतीला साथ देईल

आमदार प्रवीण दरेकर यांचा विश्वास महाड : महेश शिंदे कोकणातला मतदार हा विचाराअंती मतदान करतो. येथील नागरिकांना भ्रष्टाचारी आणि सदाचारी यातला फरक समजतो. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता सुनील तटकरेंच्या भूलथापांना बळी न पडता केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्याच पाठीशी उभी राहील आणि त्यांना भरघोस मतांनी …

Read More »

सुनील तटकरे रायगडला लागलेला कलंक -उद्धव ठाकरे

माणगाव : प्रतिनिधी        रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी आहे. शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत रयतेचे रक्षण करीत राज्य केले, मात्र इथल्या तटकरेंनी शेतकर्‍यांच्या जमिनी लुबाडून घेत त्या आपल्या घशात घातल्या. तटकरे हा रायगडला लागलेला कलंक आहे. अशा कलंकीत तटकरेंना या निवडणुकीत ठेचा, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. …

Read More »

म्हसळ्यात श्री धावीर देव मंदिर वर्धापन दिन

म्हसळा : प्रतिनिधी : येथील ग्रामदेव श्री धावीर देव मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी उपाध्यक्ष नंदू गोविलकर यांच्या हस्ते श्री धावीर देवाची षोड्शोपचार पूजा करण्यात आली. या वेळी अध्यक्ष सुभाष ऊर्फ बाळ करडे यांच्यासह विश्वस्त मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सकाळी मंदिरापासून श्री धावीर …

Read More »

किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादनाचे आज आयोजन

महाड : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम शुक्रवार (दि. 19)  किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने चैत्र पौर्णिमा शुक्रवारी …

Read More »

ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ

मुरूड : प्रतिनिधी : मुरूडचे ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून, हे मंदिर सजवण्यात आले आहे. या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, कल्याण व डोंबिवली भागातील असंख्य भक्तगण आल्याने मुरूडमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. मुरूड समुद्रात कासा किल्ल्यात शिवाजीराजांनी भवानी मातेची स्थापना केली आहे. कोट म्हणजे किल्ला आणि किल्ल्यातील …

Read More »

लौजी प्राथमिक शाळेत भुरट्या चोरांचा हैदोस

खोपोली : प्रतिनिधी : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या लौजी येथील वासुदेव बळवंत फडके या शाळेत बुधवारी (दि. 17) रात्री भुरट्या चोरांनी हैदोस घातला. चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत सर्व वर्गखोल्यांचेही कुलूप तोडले. व सामान अस्ताव्यस्त केले. शाळेच्या बालवाडी वर्गातील लहान मुलांची खेळणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आणलेले गणवेश चोरट्यांनी लंपास केले. …

Read More »

मुरूड नांदगावमध्ये नारळाचे झाड पडून तीन जखमी

मुरूड : प्रतिनिधी : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुरुवारी (दि. 18) दुपारी नारळाचे झाड बाजूच्या एका घरावर आणि रस्त्यावर कोसळले. त्यामुळे घरातील तीन व्यक्ती जखमी झाल्या, तर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील अब्दुलसत्तार म्हसलाई यांच्या बागायत जमिनीमधील एक नारळाचे झाड जोरदार वार्‍यामुळे मुळासकट …

Read More »

परळीत विदेशी दारू साठा जप्त

भरारी पथकाची कारवाई, दोन आरोपी अटकेत पाली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने परळी (ता. सुधागड) येथे एका कारमधून विदेशी दारू साठा जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली. पाली-खोपोली राज्य महामार्गवरील वाकण, पाली, पेडली, परळी या मुख्य नाक्यावर भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. …

Read More »