कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी शनिवारी (27 एप्रिल) सायंकाळी पोलिसांनी कर्जत शहरातील सर्व भागात रूट मार्च केले. 18 …
Read More »Monthly Archives: April 2019
वाढलेल्या तापमानामुळे आंबा उत्पादनात घट
अलिबाग : प्रतिनिधी मार्च महिन्यापर्यंत लांबलेली थंडी, मागील 15 दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची भीती रायगडातील आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण 44 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम …
Read More »श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा स्वच्छ
रेवदंडा : प्रतिनिधी श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या संयोजनातून हजारो श्रीसदस्यांच्या श्रमदानातून रेवदंडा समुद्रकिनारा नित्य स्वच्छ असल्याचे रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनीषा चुनेकर यांनी म्हटले. रेवदंडा समुद्रकिनारी आठ, पंधरा व महिन्यामध्ये समुद्र किनारा, तसेच सुरूबन स्वच्छता मोहीम असंख्य श्रीसदस्यांच्या श्रमदानातून राबविली जाते. समुद्रकिनार्यावरील केरकचरा, अनावश्यक वाढलेली झाडेझुडपी अथवा प्लॅस्टिक बाटली …
Read More »निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई
कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघातील चार गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहशत पसरवली जाऊ नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कक्षेत कर्जत, नेरळ आणि माथेरान या तीन …
Read More »मतदान प्रक्रियेत मतदारांनी सहभागी व्हावे -परदेशी
कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उद्या 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे, जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या …
Read More »नवी मुंबईत निवडणूक यंत्रणा झाली मतदानासाठी सज्ज
नवी मुंबई : बातमीदार : शनिवारी प्रचार थंडावल्यावर निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. अनेक दिवस मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या निवडणूक यंत्रणेसमोर आता निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. त्यानुसार 28 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहचल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात …
Read More »रसायनी परिसरात पोलिसांचे संचलन
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खालापूर तालुक्याचे डीवायएसपी डॉ. रणजित पाटील, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक …
Read More »युतीतील समन्वयामुळे गीतेंचा विजय निश्चित -कोबनाक
म्हसळा : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख व भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी म्हसळा तालुक्यातील पत्रकारांजवळ सुसंवाद बैठक घेतली. यामध्ये मतदारसंघाच्या विकासासोबत म्हसळा तालुक्याचा विकास हाच भाजपचा ध्यास असे धोरण असल्याचे स्पष्ट करीत. राष्ट्रीय सुरक्षा व विकास या मुद्द्यावर युतीचा प्रचार केंद्रित आहे. महायुतीचे उमेदवार अनंत …
Read More »मतदानासाठी प्रशासनाची जोरदार तयारी
पोलीस आयुक्त संजय कुमार यांची भेट पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सोमवारी (दि. 29) परिमंडळ-2 परिक्षेत्रात होत असून त्याअंतर्गत निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आज विविध मतदान केंद्रांवर नेमणूक करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी रवाना होणार आहेत. त्यांना काल नवी …
Read More »श्रीरंग बारणेंना विजयी करण्याचे आवाहन
उरण : वार्ताहर : शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे पदाधिकारी योगेश रामदास कदम यांनी उरण तालुक्यात शनिवारी (दि. 27) अनेक शिवसैनिकांची भेट घेतली आणि महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या वेळी त्यांनी तालुक्यातील म्हातवली-नागाव गावात असलेल्या शिवसेना शाखेत जाऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper