Breaking News

Monthly Archives: April 2019

धोनीचा पारा चढला; मैदानात चहरला झापले

चेन्नई : वृत्तसंस्था महेंद्रसिंग धोनीच्या कल्पक नेतृत्वासमोर किंग्स इलेव्हन पंजाबला हार मानावी लागली. धोनीने त्याच्या गोलंदाजांचा सुरेख वापर करताना पंजाबच्या धावगतीवर चाप बसवला आणि चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 22 धावांनी जिंकला. सामन्यात कॅप्टन कूल धोनीचा पारा मात्र चढलेला पाहायला मिळाला. त्याने दीपक चहरला चांगलेच सुनावले. धोनी फार क्वचितच रागावलेला …

Read More »

कुंडलिका नदीच्या किनारी रंगली शिडहोडी स्पर्धा

रोहे ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील खारापटी हा गाव संपूर्ण कोळी समाजाचा असून हा गाव उत्सवप्रिय आहे. या गावातील गणेश आळी मित्र मंडळाच्या वतीने कोळी समाजाचे विविध उत्सव साजरे केले जातात. यावर्षी कुंडलिका नदीच्या किनारी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिडहोडीचा थरार स्पर्धेतून दिसून आला. या स्पर्धेची रंगत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोळी बांधव नदी …

Read More »

मुंबईचा दणदणीत विजय; चेन्नईनंतर हैदराबादची घोडदौड थांबवली

हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबादबरोबर झालेल्या मॅचमध्ये पाहुण्या मुंबईने यजमानांचा 40 धावांनी पराभव केला आहे. अल्झारी जोसेफच्या बॉलिंगसमोर कोणत्याच  बॅट्समनला टिकता आले नाही. अल्झारी जोसेफने तब्बल 6 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी केवळ 137 धावांचे माफक आव्हान दिले होते. हैदराबादला केवळ 96 रनच करता आल्या. हैदराबाला 20 ओव्हर …

Read More »

‘चोराच्या मनात चांदणे’

घोडा-मैदान लांब नाही, तुमचे सोंगनिश्चितपणे सार्‍या जगासमोर येईल! पनवेल : रामप्रहर वृत्त कुणी एखाद्यावर कितीही शिंतोडे उडविले, तरी जनता सुज्ञ आहे. ती सारे काही जाणते. त्यामुळे जनतेची दिशाभूल करू नका. घोडा-मैदान लांब नाही. कोण चूक आणि कोण बरोबर याचा फैसला येत्या सहा महिन्यांत होणार आहे. त्या वेळी तुमचे सोंगनिश्चितपणे सार्‍या …

Read More »

पनवेलमध्ये नववर्षाचे जल्लोषात स्वागत; शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये शनिवारी (दि. 6) आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेस नागरिकांनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये सन 1999पासून शोभायात्रा काढली जाते. यंदा शोभायात्रेचे 21वे वर्ष होते. शहरातील …

Read More »

जगाच्या नेतृत्वाची मोदींमध्ये क्षमता

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन पाली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ आपल्या देशाचे नव्हे; तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले सक्षम नेते असल्याचे खणखणीत प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे काढले. ते महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठकीत बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील …

Read More »

महाडमध्ये 500 सुरे जप्त; एकाला अटक

महाड : प्रतिनिधी शहरातील राधिका लॉजवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी केलेल्या तपासणीत एकाकडे जवळपास पाचशे सुरे सापडले. त्याला अटक करण्यात आली आहे. ऐन निवडणूक काळात हा शस्त्रसाठा सापडल्याने त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी असून, या अंतर्गत महाड शहरात शुक्रवारी रात्री तपासणी केली जात असताना राधिका लॉजवर …

Read More »

पार्थचे ‘ते’ कृत्य चुकीचेच!

पंढरपूर : प्रतिनिधी पार्थ पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. ख्रिस्ती धर्मगुरूकडे जाण्याचे कृत्य चुकीचेच होते. त्याच्या हातून अजाणतेपणी ती चूक घडली, मात्र मी त्याला समजावून सांगितले आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवत असलेलेपार्थ पवार हे वारंवार ट्रोल होत आहेत. …

Read More »

काँग्रेस पक्षाची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी

नांदेड : प्रतिनिधी काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे, जे दिवसेंदिवस बुडतच चालले आहे. काँग्रेससोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेससारखे मित्रही एकतर स्वतः बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून पळ काढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा शनिवारी (दि. 6) नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. …

Read More »

श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन

पनवेल : तालुक्यातील दापोली येथे गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी श्री विष्णू लक्ष्मी पालखी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचे उत्सवाचे 36वे वर्ष आहे. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी भेट देत लक्ष्मी नारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, अनिकेत …

Read More »