लंडन : वृत्तसंस्था 30 मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये अनेक टीम या तगड्या आहेत. न्यूझीलंडच्या संघाला या वर्ल्ड कपमध्ये डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जात आहे. या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही, मात्र या संघानं नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केलेली आहे. …
Read More »Monthly Archives: May 2019
पायलची आत्महत्या नव्हे, हत्याच
मुंबई ः प्रतिनिधी नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या मृत्यूबद्दल तिच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. पायलने आत्महत्या केली नसावी. तिची हत्या झाली असावी, असा आरोप तिच्या पतीने केला आहे. वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होत असलेल्या रॅगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी डॉक्टरांवर …
Read More »नरेंद्र मोदी करिश्मा असलेले नेते ः रजनीकांत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी नरेंद्र मोदी यांना करिश्मा असलेले नेते म्हटले आहे. मोदी यांची प्रशंसा करताना त्यांनी राहुल गांधींबाबत सहानुभूती दाखवत टिप्पणी केली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना सहकार्य केले नाही. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना हाताळण्यासाठी राहुल खूपच …
Read More »नवीन बसेसची देखभाल खाजगी कंपनीकडे
पुणे ः प्रतिनिधी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल होणार्या 400 सीएनजी बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम खासगी कंपनीकडे देण्याचे विचाराधीन आहे. देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे बसेसचे सातत्याने होणारे ब्रेकडाऊन, तांत्रिक बिघाड यामुळे दररोज सुमारे पाच हजार फेर्या रद्द होतात. त्यामुळे पीएमपीचे आर्थिक नुकसानही होत आहे. परिणामी नवीन येणार्या बसेसच्या देखभाल-दुरूस्तीचे काम …
Read More »कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया स्कूल एसी हॉलमध्ये आयोजित राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
Read More »एनडीएला राज्यसभेतही मिळणार बहुमत
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जबरदस्त विजय मिळवला आहे. केवळ एनडीएच नाही, तर भाजपलाही स्वबळावर 303 जागा मिळाल्या. लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजप आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांत लोकसभेमध्ये बहुमत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपने आणलेली अनेक महत्त्वाची …
Read More »पद्मदुर्गावर लोकवर्गणीतून दोन तोफगाडे ; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
मुरूड ः प्रतिनिधी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यात जवळपास 41 तोफा असून, त्यातील काही तोफांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यापैकी दोन मोठ्या तोफा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 26) तीनचाकी आणि चारचाकी लाकडी गाड्यांवर बसविण्यात आल्या आहेत. पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यातील तोफांचे संवर्धन करण्याच्या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानने …
Read More »गद्दार किसन धोंडू पाटील यांची भाजपतून हाकालपट्टी
पनवेल ः प्रतिनिधी वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवाराविरोधात मतदान करणारे उपसरपंच किसन धोंडू पाटील यांची भाजपतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर उपसरपंच किसन धोंडू पाटील यांनी केलेली गद्दारी लक्षात येताच बेलवली भाजप गाव कमिटीने किसन पाटील यांची या गद्दारीबद्दल पक्षातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. …
Read More »आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करा ; रायगडातील पत्रकारांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण करणारे शेकापचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांकडून सोमवारी (दि. 27) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील …
Read More »सिडकोंतर्गत गावे आणि नळजोडणी धारकांसाठी अभय योजना मंजूर
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळजोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये आणि सहा महिने कालावधीत भरण्याची ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळजोडणीधारक यांच्याकडील थकीत पाणीपट्टीची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper