Breaking News

Monthly Archives: May 2019

‘पुढील पाच वर्षे भारतासाठी एकलव्यासारखे काम करेन’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मला विजयाचा विश्वास होता, मात्र विजय पचवण्याची क्षमता असायला पाहिजे. पुढील पाच वर्षें भारतासाठी मी एकलव्यासारखे काम करणार आहे, असे उद्गार देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातेतील अहमदाबाद येथील 50 वर्षे जुन्या भाजप कार्यालयाबाहेर झालेल्या सभेमध्ये काढले. लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर …

Read More »

पुनाळेकर, भावेला 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे ः डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे सत्र न्यायालयाने 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना शनिवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली होती. दाभोळकर …

Read More »

राजन पिल्ले यांच्यातर्फे चहा, नाश्ता व पेढ्यांचे वाटप

कळंबोली : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण बहुमताने एनडीए सरकार पुन्हा सत्तेवर आले. याबद्दल कळंबोली सेक्टर 8 नाका येथे राजन पिल्ले यांच्यातर्फे रविवारी (दि. 26) चहा, नाश्ता व पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

शनिवारी मासिक संगीत सभेचं आयोजन

पनवेल : येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात शनिवारी मासिक संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाची ही 21 वी मासिक संगीत सभा होती. या वेळी गायिका प्राजक्ता काकतकर, हार्मोनियम वादक केदारजी भागवत, तबला वादक अभिजित काकतकर, भाजपचे सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष उमेश चौधरी, उपाध्यक्ष नारायणबुवा पाटील यांच्यासह मान्यवर …

Read More »

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा

पनवेल : मावळ लोकसभा मतदासंघातून युतीचे श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाला. त्यानिमित्त भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा रायगड जिल्हा प्रभारी सय्यद अकबर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते इरफान तांबाळी, चमाल शहा, दर्गा ट्रस्टचे विश्वस्त जावेद बाबा, लोककल्याणकारी सेवा संस्थेचे …

Read More »

उड्डाणपुलावरील झाडे सुकली

लाखो रुपयांचे नुकसान, कुंड्यांमधील झाडे गायब पनवेल : बातमीदार नवीन पनवेल ते खांदा कॉलनी शहराला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे तासन्तास रेल्वेच्या बंद फाटकाजवळ थांबणार्‍या वाहनचालकांना दिलासा मिळाला. वाहतूक कोंडी देखील कमी झाली, मात्र या उड्डाण पुलावरील दुभाजकावर लावलेल्या झाडांकडे सिडकोचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे रहिवाशांचे …

Read More »

पनवेल मनपा हद्दीत डेबिट कार्डने पेमेंट स्वीकारण्यास नकार

महानगर गॅस आणि पेट्रोल पंपांवर कारवाईची मागणी पनवेल : प्रतिनिधी डिजिटल इंडियाचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहत असताना पनवेल महानगरपालिका हद्दीत महानगर गॅस पंपावर आणि अनेक पेट्रोल पंपांवर  डेबिट कार्डने पेमेंट स्वीकारण्यास नकार देऊन ग्राहकांची अडवणूक करून त्यांची लूटमार करण्याचा धंदा सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. …

Read More »

पनवेल येथून अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

पनवेल : वार्ताहर 16 वर्षीय मुलास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. शहरातील पनवेल रेल्वे स्टेशनजवळील आझाद नगर झोपडपट्टी येथे राहणार्‍या विमल कुमारस्वामी कोंडर यांचा 16 वर्षीय मुलगा आकाश याला राहत्या घरातून कोणीतरी अज्ञाताने काही कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस …

Read More »

ब्राह्मण सभेच्या वतीने सावरकर जयंती व व्यसनमुक्ती पथनाट्य

पनवेल : रामप्रहर वृत्त ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने स्वा. सावरकर जयंती व व्यसनमुक्ती पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल, सेक्टर 11 येथील सिडको उद्यानातील एम्फी थिएटरमधेे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला नगरसेविका मुग्धा लोंढे, संवेदना रुग्णसेवा समितीचे प्रवर्तक प्रसाद अग्निहोत्री, शिवसेेेना महिला आघाडीच्या अपूर्वा प्रभू, भाजपा युवा …

Read More »

खोपोली नगरपालिका शाळांत तुटलेली खेळणी

खोपोली : प्रतिनिधी शंभर कोटीपेक्षा अधिक वार्षिक बजेट असलेल्या खोपोली नगरपालिकेकडून नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होत आहे. खोपोली नगरपालिकेच्या बहुतेक शाळांत स्वच्छतागृहांची अतिशय दुरावस्था झाल्याने बंद ती आहेत.दुसरीकडे नगरपालिका शाळांच्या आवारात खेळणी आहेत, पण ती तुटलेली व असुरक्षित स्थितीत आहेत. खोपोली नगरपालिकेच्या बारापैकी काही शाळांमध्ये स्वच्छतागृहेच …

Read More »