Breaking News

Monthly Archives: May 2019

खासदार बारणे यांच्या विजयाची नेरळमध्ये मिरवणूक

कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले असून, त्या निमित्ताने नेरळमध्ये विजयी जल्लोष करण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ भागात मिरवणूक काढून आणि व्यापार्‍यांना लाडू वाटून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला. नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी मिळाली. त्याचा जल्लोष नेरळमध्ये साजरा करण्यात …

Read More »

शेलू रेल्वे स्थानकात पादचारी पूल आणि निवारा शेडचे काम वेगाने सुरू

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत मार्गावरील शेलू स्थानक विकसित करण्यात येत आहे. या स्थानकात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. दरम्यान, नवीन पादचारी पूल आणि निवारा शेडची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी दोन्ही कामे पूर्ण केली जातील असे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील …

Read More »

पेणमध्ये दुकानाला भीषण आग, लाखोंची मालमत्ता भस्मसात

पेण : प्रतिनिधी येथील एसटी स्टॅण्डच्या मागील भागात असलेल्या अंतोरा रोडवरील समर्थ खत बियाणे एजन्सीच्या दुकानाला शनिवारी (दि. 25) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीत दुकानातील खते, बियाणे व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे सदर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत. पेणमधील …

Read More »

मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक बंद

अलिबाग : पावसाळा आल्यामुळे अलिबाग तालुक्यातील  मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक रविवार (दि. 26)पासून बंद होत आहे. चार महिने ही जलप्रवास वाहतूक बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यापासून ही वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईहून अलिबागला येण्यासाठी  सोयीचा मार्ग म्हणजे जलप्रवास. या प्रवासामुळे वेळेची, पैशाची …

Read More »

धरणाचे पाणी बिल्डरच्या घशात

पाली भूतीवली परिसरातील आदिवासी तहानलेलेच; जमिनी कोरड्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासनाने पाली भूतीवली धरणाची निर्मिती केली आहे. या धरणामध्ये 2004 पासून पावसाचे पाणी साठून राहत आहे. मात्र शेतीसाठी पाणी पुरविण्याकरीता पाटबंधारे विभागाने कालवेच बांधले नसल्याने  या धरणाच्या पाण्यावर शेती …

Read More »

मोबाईल सांभाळा, अन्यथा पडेल अब्रुवर घाला

हॅलो, हॅलो… सारख्या सारख्या मिस्कॉलने नम्रताचे (नाव बदलले आहे) मानसिक संतुलन बिघडले होते. सकाळी, संध्याकाळी, बाथरूममध्ये कुठेही अगदी झोपेच्या वेळीही मोबाईलची रिंगटोन ‘कहो ना प्यार है’, कानावर पडत असे. एकदोनदा त्या अनोळखी फोनवर आलेले कॉल नम्रताने उचललेही होते. काही कॉल घरचे किंवा सासरचे असतील असा भास झाल्याने नम्रताने फोन उचललेही …

Read More »

विकास आणि राष्ट्रवादाचा विजय, नकारात्मकतेला मूठमाती

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी 10 मार्च 2019 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताच्या 17व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि संपूर्ण देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आले. 19 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीसह 59 मतदारसंघात सातव्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर 23 मे 2019 …

Read More »

कर्मचार्‍यानेच घातला एक कोटी 16 लाखांचा गंडा

पनवेल : वार्ताहर एपीएमसीच्या फळ मार्केटमधील कलिंगडच्या व्यापार्‍याकडे हिशेब तपासणीस म्हणून कामाला असलेल्या तरुणाने कलिंगड खरेदी विक्रीच्या व्यवसायातील तब्बल एक कोटी 16 लाख 84 हजार रुपयांचा अपहार करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुजफ्फर मोहम्मद फ्रुटवाला असे आरोपीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध …

Read More »

मतमोजणी केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी जयंत पाटलांसह चार आमदारांवर गुन्हा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना मातमोजणी केंद्रात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकारणी रायगड जिल्ह्यातील चार आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 मे रोजी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा  क्रीडा संकुलामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. ही मतमोजणी पूर्ण झालेली नसताना शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार  पंडित पाटील, …

Read More »

जनता विद्यालयाचे स्नेहसंमेलन; 27 वर्षांनंतर मित्र आले एकत्र

रसायनी : प्रतिनिधी रसायनी परिसरातील जनता विद्यालय मोहोपाडा शाळेत 1992 मध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेतलेल्या मित्र परिवाराचा स्नेहमेळावा नुकताच एस. पी. फार्मला झाला. 1988 मध्ये सहावीत प्रवेश घेतला. गरिबीची झळ सोसत 1992 मध्ये दहावी पार केली आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. कोणाचीही भेटगाठ होत नव्हती. प्रत्येक जण …

Read More »