Breaking News

Monthly Archives: May 2019

आषाणेवाडीची तहान भागली ; उमरोली ग्रा. पं.कडून टँकरद्वारे पाणीपुरवठा

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील आषाणे आदिवासी वाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.  येथील आदिवासी बांधवांना पिण्याचे पाणी घरी नेण्यासाठी करावी लागणारी धडपड लक्षात घेऊन उमरोलीचे सरपंच आणि अन्य पदाधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आषाणे वाडीमध्ये बुधवार (दि. 22) पासून पाण्याचा ट्रँकर सुरू केला. प्रसिद्ध आषाणे धबधब्याच्या वरच्या बाजूला …

Read More »

विद्यार्थ्यांनी सुट्टीत करा कौशल्यवर्धन

जगात चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते. कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खर्या अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ती म्हणजे पैसा नव्हे तर विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे ऊर्फ स्किल्ड मॅनपॉवर. अलीकडील काळातील बेरोजगारीचे वास्तव लक्षात घेतले तर असे दिसून येईल की, …

Read More »

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची जोरदार मुसंडी

सोलापूर ः प्रतिनिधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसर्‍यांदा प्रतिनिधित्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा फटका बसणार नाही, असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात …

Read More »

मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार ः मनोज कोटक

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली असून विजयानंतर त्यांनी शुक्रवारी आपली प्रतिक्रिया दिली. गेली अनेक वर्षे आपण मुंबईचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. यापुढेही आपण मुंबईकरांना दिलासा देण्याचाच प्रयत्न करणार असल्याचे कोटक म्हणाले. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या ईशान्य मुंबईच्या जागेचा …

Read More »

‘राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे’

कोल्हापूर ः प्रतिनिधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती, परंतु याच शेतकर्‍यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकर्‍यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकर्‍यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकर्‍यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी …

Read More »

महर्षी अण्णासाहेबांच्या काढ्याचे घनसार गोळीस्वरूपात अनावरण

पुणे ः प्रतिनिधी लोकमान्य टिळकांचे राजकीय गुरू, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या 172व्या जयंतीनिमित्त पॅट फार्मास्य्ाुटिकल्स प्रा. लि. पनवेलतर्फे महर्षी आण्णासाहेबांच्या तेरापंथी काढ्याचे घनसार गोळी स्वरूपात पुणे येथे अनावरण करण्यात आले. हे अनावरण अण्णासाहेबांचे पणतू जावई विनायक कृष्णाजी गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन औषधाविषयी माहिती देताना पॅट फार्माचे मालक  …

Read More »

अमेठीकरांसाठी उगवली नवी पहाट -स्मृती इराणी

अमेठी ः वृत्तसंस्था अमेठी हा लोकसभा निवडणूक 2019मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजप नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात टक्कर होती. राहुल यांचा अमेठीत पराभव झाल्यानंतर अमेठीतील राजकीय चित्र पालटले आहे. अशा प्रकारे संजय गांधी यांच्यानंतर राहुल असे ’गांधी’ आहेत, ज्यांना अमेठीच्या जनतेने …

Read More »

रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई ः प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणार्‍या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. या वेळी संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तत्काळ अटक …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये शाह‘निती’ यशस्वी ; 18 जागांवर भाजपचा विजय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकणार्‍या भाजपने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणार्‍या तृणमूल काँग्रेसला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर …

Read More »

थीम पार्कचे काम अंतिम टप्प्यात

पेण नगर परिषदेची दोन कोटी 50 लाखांची तरतूद पेण : प्रतिनिधी शहरातील म्हाडा वसाहत परिसरात सुमारे दोन कोटी, पन्नास लाख खर्च करून उभारण्यात येत असलेल्या थीम पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरणतलावापाठोपाठ थीम पार्कच्या कामामुळे पेण शहरातील नागरिकांना विरंगुळ्याची आणखी एक सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरात थीम पार्क व्हावे, …

Read More »